नवी मुंबई : नवी मुंबईतील कायम गजबजलेल्या सानपाडा रेल्वे स्टेशन बाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याने खळबळ उडाली.  काही लोकांची मदत वेळेवर अग्निशमन दल पोहचल्याने त्याचा जीव वाचला असून त्याच्यावर वाशी मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज (सोमवारी) दुपारी साडेचार पावणेपाचच्या सुमारास सानपाडा रेल्वे स्टेशन बाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याने खळबळ उडाली.

हेही वाचा >>> नवी मुंबईत स्वच्छतेबाबतची मरगळ संपता संपेना…; निर्माल्य कलश भरले; उचलणार कधी ?

pune crime news, pune youth committed suicide
पुणे: सासरच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

पेट घेतल्यावर तो झाडीत पडला तेव्हढ्यात त्याला विझवण्याचा प्रयत्न आसपासच्या लोकांनी केला तर काहींनी थेट अग्निशमन दलास फोन केले. मात्र तोवर त्याला लागलेली आग विझली आणि त्यानंतर त्याला वाशीमधील प्रथम संदर्भ रुग्णलयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले त्यावेळी त्याने स्वतःची ओळख  महेश रामचन्द्र पांढरे म्हणून करून दिली. आत्महत्येचा प्रयत्न का केला अशी विचारणा केल्यावर त्याने स्वतःच्या एका मित्राचा नंबर दिला. त्याच्या मित्राला पोलिसांनी विचारणा केल्यावर त्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून चार दिवसांपासून पत्नीने घरात घेणे बंद केल्याची माहिती समोर आली. कदाचित या नैराश्यातून त्याने हे कृत्य केले असेल अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.