नैना प्रकल्पाच्या पथदर्शी आराखडय़ावर अनेकांच्या नजरा

पनवेल तालुक्यातील ३७ किलोमीटर परिसरातील २३ गावांचा विकास आराखडा सिडकोने तयार केला आहे.

 

गेली साडेतीन महिने राज्य शासन मंजूरीच्या प्रतिक्षेत असलेल्या नैना क्षेत्रातील २३ गावांचा सिडकोने तयार केलेल्या पथदर्शी आराखडय़ावर नागरीकांसह अनेक विकासकांच्या नजरा लागू राहिल्या आहेत. पनवेल तालुक्यातील ३७ किलोमीटर परिसरातील २३ गावांचा विकास आराखडा सिडकोने तयार केला असून तो सप्टेंबर १५ रोजी मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. या आराखडय़ाची शहनिशा करण्यासाठी तो शासनाने पुण्यातील नियोजन विभागाकडे पाठविल्याने त्यावर मंजूरीच्या मोहर उमटण्यास विलंब होत असल्याचे समजते. राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्राचा (नैना) विकास करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे. ठाणे, उरण, कर्जत, पेण, खालपूर, पनवेल अशा सहा तालुक्यातील २७० गावांचा या विकास आराखडा तयार करण्याचे काम सिडकोचा नियोजन विभाग करीत आहे. सुमारे ६०० किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या भागातील पहिल्या टप्याचा सिडकोने एक पथदर्शी विकास आराखडा तयार केला आहे. यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे. हा आराखडा १३ ऑगस्ट २०१४ रोजी राजपत्रात प्रसिध्द करण्यात आला असून त्यावर चार हजार हरकती व सूचना आल्या होत्या. सिडकोने या हरकती व सूचनेनुसार आवश्यक तो बदल हा प्रारुप आराखडा २२ सप्टेंबर २०१५ रोजी राज्य शासनाच्या मंजूरीसाठी पाठविला आहे. तो अद्याप मंजूर न झाल्याने अनेकांच्या त्या प्रारुप आराखडय़ाकडे नजरा लागून राहिल्या आहेत.

सिडकोने नैना क्षेत्रातील २३ गावांचा सहभाग असलेला प्रारुप विकास आराखडा शासनाकडे मंजूरीसाठी सप्टेंबर रोजी पाठविला आहे. नगरविकास विभागाने हा आराखडा नगररचना संचालक पुणे यांच्याकडे पाठविला असून त्यांच्याकडून शासनाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे त्याला आणखी एक ते दोन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे दिसून येते.

श्री, वेणुगोपाल, अतिरिक्त मुख्य नियोजनकार, सिडको

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Many people keeps on eyes on pilot demonstration plan of naina project in navi mumbai

ताज्या बातम्या