नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणावरील तरंगता सौरउर्जा प्रकल्प, घणसोली ऐरोली पामबीच मार्ग, बहुचर्चित कोपरी उड्डाणपुल, स्मार्ट पार्किंग पॉलीसी ,नेरुळ येथील रेल्वेमार्गावरील पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणुल असे अनेक प्रकल्प कागदावर असून यंदाच्या अर्थसंकल्पाच्याबाबत पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विविध विभागाच्या बैठकांना बुधवारपासून सुरवात केली आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प हा ५५०० कोटी पर्यंत जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा >>>नवी मुंबई : रस्त्यावर चालायचं तरी कुठून? सीवूड्स रेल्वे स्थानकाजवळील L&T च्या गृहनिर्मिती प्रकल्पामुळे नागरिक हैराण
तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांनी २०२२-२३ कोणतीही करवाढ नसलेला व १.८० कोटी शिलकीचा नवी मुंबई महापालिकेचा नागरीककेंद्रीत अर्थसंकल्प सादर केला होता.नवी मुंबई महानगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला २०२२-२३ या वर्षाचा १३५४.३५ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह ४९१० कोटी जमा व ४९०७.२० कोटी खर्चाचे व १ कोटी ८० लाख कोटीच्या शिलकीचा २०२२-२३ चा मूळ अर्थंसंकल्पीय अंदाज तत्कालिन पालिका आयुक्त व प्रशासक बांगर यांनी गेल्यावर्षी सादर व मंजूर केला होता . यंदा आगामी काळात पालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक जुने प्रकल्प पूर्ण करण्याचे व शिक्षण,आरोग्य ,पर्यावरण यांना विशेष महत्व देत नागरिकांना सोयीसुविधेच्यादृष्टीने नागरीककेंद्रित अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्याचा प्रयत्न नार्वेकर यांचा राहणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>>…तर माथाडी विधानभवनावर धडकणार, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा इशारा
श्रीमंत महापालिका असलेल्या नवी महापालिकेच्या अर्थसंकल्पात नवी मुंबईकरांवर कोणतीही दरवाढ यावर्षीही टाळली जाणार असल्याचेच चित्र आहे. शहरात नागरीकांच्या हितासाठी भविष्याचा विचार करता नवी मुंबईकरांना भौतिक व नागरी सुविधा देण्याबरोबरच जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य ,शिक्षण,परिवहन, यासारख्या चांगल्यासुविधा देण्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण कामे निश्चित करण्यात येणार आहेत.परंतू अनेक जुन्या प्रकल्पांना पूर्ण करण्याचे उदिष्ट या अर्थसंकल्पात पाहायला मिळणार आहे. लिडार सर्वेक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पालिकेने नियोजन असून कागदावरच राहीलेले प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याकडे कल असणार आहे. घणसोली ते ऐरोली खाडीवर पूल बांधणे ,मोरबे धरणावर तरंगता सोलार प्रकल्प बनवण्याचे लक्ष कागदावरच आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प हा शहराला अधिक गतीशील करण्याचा व नागरीकांसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होणार असल्याचे चित्र आहे.तर वाशी कोपरी उड्डाणपुल विरोधामुळे वादातीत सापडला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाविषयी पालिका आयुक्त नार्वेकर यांचे बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.त्यामुळे पालिकेच्या अर्थसंकल्पाचीही नागरीकांना उत्सुकता आहे.
चौकट-नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अद्याप कागदावरच असलेले महत्वाकांक्षी प्रकल्प ………
हेही वाचा >>>नवी मुंबई : काही क्षणात दुचाकी चोरी करणाऱ्याला अटक, २३ दुचाकी जप्त
घणसोली ते ऐरोली उर्वरीत पामबीच रस्ता व पूल बांधणे
ऐरोली काटई मार्गावरुन ठाणे बेलापूर रस्त्यावर ऐरोली येथे चढ- उतारासाठी लिंक तयार करणे
वाशी सेक्टर ७ येथील महात्मा फुले जंक्शन ते कोपरी उड्डाणपुल पर्यंत नवीन उड्डाणपुल बांधणे.
मोरबे धरणावर १०० मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरउर्जा प्रकल्प व १.५ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारणे.या प्रकल्पामुळे १ वर्षानंतर प्रतिवर्ष पालिकेची २० ते २२ कोटी बचतीचे लक्ष आहे.
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात यांची लिडार सर्वेक्षणद्वारे मोजणी करुन उत्पन्न वाढवण्याचे लक्ष असून या प्रकल्पाला सुरवात झाली आहे.परंतू अद्याप लिडार सर्वेक्षणाप्रमाणे मालमत्ता कर आकारणी सुरु नसून हे काम अद्याप सुरुच आहे.तसेच पालिकेचे पदव्युत्तर वैद्यकीय विद्यालय होणार असून त्याद्वारे आरोग्यसेवा अधिक सक्षम बनवण्याचा संकल्प आहे.आगामी शैक्षणिक वर्षात मात्र वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.या कामाला मात्र गती मिळाली आहे. तर मागील १० वर्षापासून रखडलेला तुर्भे रेल्वेस्थानकाबाहेरील उड्डाणपुलाच्या कामाला उशीरा का होईना मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नातून सुरवात झाल्याबाबत माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले आहे.