नवी मुंबई : ठाण्याचे खासदार राजन विचारेंच्या हस्ते अवघ्या दोन महिन्यांपूर्वी केलेल्या ओपन जीम आणि उद्यानाचा मनपाच्या ताब्यातील भूखंड परस्पर तिसऱ्यालाच विकला. शिवसेना आक्रमक झाली असून यातील दोषींवर कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.
हेही वाचा >>> नेरुळ ते भाऊचा धक्का जलवाहतूक सेवा कधी? १११ कोटीच्या नेरुळ जेट्टीचे काम पूर्ण होऊनही जलवाहतूक कागदावरच
नवी मुंबईतील तुर्भे इंदिरानगर भागातील भूखंड एमआयडिसीने नवी मुंबई मनपा कडे वृक्ष लागवड उद्यान विकसित करणे आदींसाठी दिला होता. मात्र मनपाला न कळवता सदर भूखंड एमआयडीसीने परस्पर विकला. त्यावर बांधकाम तयारी सुरू असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मनपा अधिकाऱ्यांना कळवले.मनपा अधिकाऱ्यांनी काम बंद केले या घडामोडी मंगळवारी घडल्या. बुधवारी या बाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी यांची भेट घेत या प्रकाराबाबत जाब विचारला. मात्र या बाबत शुक्रवार पर्यंत निर्णय घेण्यात येईल असे सांगत त्यांची बोळवण केली.
विठ्ठल मोरे:( जिल्हाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यात मनपा अधिकाऱ्यांनाही माहिती असू शकते हा विचार करण्यासारखा भाग आहे. एमआयडीसीच्या जागेत आता रहिवासी आहेत . त्यात हा भूखंड मोकळा (ओपन प्लॉट) म्हणून आरक्षित आहे. तो विकला जाणेच संशयास्पद आहे.