पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांमधील खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी आक्रमक होत पनवेल पालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोर आंदोलन केले. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हातापायाला औषधाच्या पट्या घालून आले आणि मनसेचे पदाधिकारी पालिकेत शिरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलीस आणि महाराष्ट्र सूरक्षा बलच्या जवानांनी मनसेच्या पदाधिका-यांना पालिकेच्या प्रवेशव्दारावरच रोखून ठेवले. 

अतिवृष्टीमध्ये कळंबोलीत दोन ते तीन फुट पाणी साचले. पनवेल महापालिका प्रशासनाने काय नियोजन केले होते. याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे पनवेल महानगर शहर अध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर जमा झाले होते. मात्र त्यांना आंदोलनापूर्वीच रोखल्याने मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. मनसेने गुरुवारच्या मोर्चाला हँडिकॅप मोर्चा असे नाव दिले आहे. मनसेचे पदाधिकारी डोक्याला व हाताला हॅंडिकॅपच्या पट्या लावून आले होते. 

Kalamboli, under water
१२१ मीलीमीटर पावसात कळंबोली पाण्याखाली गेलीच कशी, पनवेल महापालिकेच्या बैठकीच चर्चा
panvel hoarding collapsed marathi news
पनवेल: पंधरा दिवसांपूर्वी सुरक्षित असलेला फलक पडलाच कसा
kalamboli under two feet of water
पनवेल: पाऊस बंद होऊन ४ तास उलटले; २७ मोटार पंप, ३५० कर्मचारी लावले तरी कळंबोली दोन फूट पाण्याखाली
Sarafa cheated, Panvel, Sarafa,
पनवेलमधील सराफाने साडेसहा कोटींना फसवले
share market fraud marathi news
पनवेल: शेअर बाजारातील नफ्याचे आमिष दाखवून महिलेची सव्वा चार कोटी रुपयांची फसवणूक
navi mumbai cracks on flyover
नवी मुंबई: २६ वर्षांत उड्डाण पुलाला तडे, वाहतूक बंद 
panvel ,cidco, cidco shop sale scheme
पनवेल: सिडकोची ४८ भूखंड, २१८ दुकानांची सोडत, दुकान विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस आजपासून सुरुवात
panvel water supply
पनवेल: पावसाळ्यात बुधवार व गुरुवार सिडकोवासियांचा पाणी पुरवठा बंद राहणार

हेही वाचा…पनवेल : महाराष्ट्र भवनासाठी सिडको १२१ कोटी रुपये खर्च करणार

महानगर गॅसवाहिनीचे काम पालिका क्षेत्रात सूरु असल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. सामान्य पनवेलकरांनी चालावे कुठून असा प्रश्न यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. पालिकेने खड्यांची कायमची दुरुस्ती करण्याऐवजी खडीने हे खड्डे भरल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. या खड्यात शाळेतली मुले, महिला, दुचाकीस्वार पडत असल्याने हे जीवघेणी खड्डे पावसाळ्यापूर्वी भरणे अपेक्षित असताना पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.