तळोजा कारागृहात मोबाइल

खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या मोबाइलचा वापर कोण करीत होते याचा तपास सुरू झाला आहे.

नवी मुंबई :  तळोजा कारागृहातील सामायिक जागेत सिमकार्ड नसलेला मोबाइल आढळून आल्याने कारागृह प्रशासनात खळबळ माजली आहे. याबाबत  खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या मोबाइलचा वापर कोण करीत होते याचा तपास सुरू झाला आहे.

राज्यातील सर्वात मोठ्या कारागृहापैकी एक असलेल्या तळोजा कारागृहातून हत्येची शिक्षा भोगत असलेला कैदी पळून गेल्याची घटना ताजी असतानाच आता कारागृहात मोबाइल आढळून आल्याने कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.

सध्या कारागृहात बडे नेते, चकमकीसाठी प्रसिद्ध माजी पोलीस अधिकारी, १०० कोटी हप्ता प्रकरणातील माजी पोलीस आधिकारी यांना ठेवण्यात आले आहे. त्यात मोबाइल सापडणे गंभीर बाब मानली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mobile in taloja jail akp

Next Story
सिडकोकडून भूमिपुत्रांवर अन्याय
ताज्या बातम्या