डोंबिवलीतील बुद्धिबळ प्रशिक्षकाला अटक

बुद्धिबळ शिकण्यासाठी येणाऱ्या १० वर्षीय मुलीशी प्रशिक्षकाने अश्लील चाळे केल्याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ बर्वे (३३) असे त्याचे नाव असून त्याला सोमवारी रात्री डोंबिवली येथील घरातून अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!

सौरभ बर्वे प्रसिद्ध बुद्धिबळपटू असून तो नेरुळ सेक्टर-२१ मधील यूसीएमएएस या खासगी संस्थेत बुद्धिबळाचे प्रशिक्षण देतात.अन्यही खासगी संस्थांत ते प्रशिक्षक आहेत. नेरुळ सेक्टर-२१ मधील मुलगी नेरुळ येथील यूसीएमएएस या खासगी संस्थेत जात असे. २८ जुलैला ती लहान भावासह सायंकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान संस्थेत गेली होती. बर्वेने बुद्धिबळ शिकवण्याच्या बहाण्याने त्या मुलीशी अश्लील चाळे केले. पीडित मुलीने याची माहिती पालकांना दिल्यानंतर त्यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्या आधारे बर्वे यांच्याविरोधात विनयभंगाचा आणि ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री सौरभला डोंबिवली येथील त्याच्या घरातून त्याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. आपण कुठल्याही मुलीसोबत अश्लील चाळे केले नसल्याचे सौरभचे म्हणणे आहे. आपण शाबासकी देण्यासाठी पीडित मुलीच्या पाठीवर थाप मारली होती, मात्र तिचा गैरसमज झाल्याचेही सौरभचे म्हणणे आहे.