स्वच्छतेसाठी पुढाकार नागरिकांचा उपक्रमात १२५०० पेक्षा अधिक नागरीकांचा सहभाग 

‘स्वच्छतेसाठी पुढाकार नागरिकांचा, आजचा दिवस स्वच्छताकर्मींच्या सन्मानाचा’, असे म्हणत नवी मुंबई महापालिकेने शहरातील विविध ६ विभागात आतापर्यंत हा उपक्रम राबवला असून नवी मुंबईकर नागरीकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या उपक्रमात १२,५०० पेक्षा अधिक  नागरीकांनी सहभाग घेतला असून  नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपापल्या क्षेत्रातील स्वच्छतेची जबाबदारी स्वतः झाडू हातात घेत पार पाडली आणि आपल्यातील स्वच्छताप्रेमाचे व संवेदनशीलतचे प्रत्यक्ष दर्शन घडविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबईत भरधाव वाहनांचा कहर, वर्षभरात तब्बल ११ हजारांपेक्षा जास्त वाहनांवर RTO ची कारवाई

नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात तिसरा क्रमांक मिळालेला आहे. त्यामुळे या क्रमांकावरुन वरच्या क्रमांकावर मजल मारण्याचे लक्ष पालिकेने ठेवले आहे. वरचा क्रमांक प्राप्त झाला तर नक्कीच सर्वांना शहराचा व नागरीकांचा अभिमान वाटणार आहे. पण देशभराती स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक खाली आला तर मात्र ती शहरासाठी भूषणावह गोष्ट ठरणार नाही. त्यामुळे किमान आहे तो क्रमांक टिकवणे किंवा वरचा क्रमांक मिळवणे यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.शहरातील रविवारची सकाळ. सार्वजनिक सुट्टीचा दिवस. नेहमीची कामे आरामात करण्याचा, उशीरा उठण्याचा. पण नवी मुंबईकर नागरिकांनी  शहर स्वच्छतेसाठी दररोज लवकर उठून आपले कर्तव्य बजावणाऱ्या स्वच्छताकर्मींनाच एक दिवस सुट्टी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करायचे निश्चित केले असून आतापर्यंत ६ विभागात याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी ६.३० वाजल्यापासून हे नागरीक आपल्या  विभागातील विविध परिसरात रस्ते, पदपथ झाडताना व तो कचरा गोळा करताना उत्साही नागरिक रस्त्यारस्त्यावर दिसू लागल्याचे चित्र रविवारच्या दिवशी पाहायला मिळत आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेसाठी  किती मोठे काम उभे करू शकते याचे प्रत्यक्ष दर्शन नवी मुंबईकरांना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : शहरातील पालिकेची ७८ खेळाची मैदाने विभाग कार्यालयाकडून विकासात्मक कामासाठी क्रीडा विभागाकडे

तसेच विविध विभागात  रॅली काढून नागरीकही पालिकेच्या माध्यमातून  स्वच्छता संदेशाचे प्रसारण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली,  नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग स्वच्छतेसाठी वेगाने काम करत असल्याचे चित्र आहे. महिनाभरापूर्वी मात्र शहरात स्वच्छतेबाबत मरगळ निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. रस्त्यावरील कचरा तसेच अंतर्गत भागातील स्वच्छता याबाबत मरगळ आली होती.परंतू पुन्हा एकदा नागरीकांच्या माध्यमातून स्वच्छतेला पुन्हा वेगाने व उत्फुर्तपणे नागरीक स्वच्छतेत सहभागी होत आहेत. विविध विभाग कार्यक्षेत्रातील विविध घटक, संस्था,शाळा, महाविद्यालय , विविध संस्थांच्या पदाधिकारी, सदस्य स्वयंस्फुर्तीने सहभागी होत ‘ माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे घोषवाक्य स्वच्छता कामगारांना एक दिवस त्यांच्या कामापासून सुट्टी देत, एवढेच नव्हे तर त्यांचे काम स्वतः करीत प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचा संदेश देत आहेत.

नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात आतापर्यंत स्वच्छतेसाठी पुढाकार नागरीकांचा या माध्यमातून ६ विभाग कार्यालय क्षेत्रात नागरीकांचा अतिशय उत्तम सहभाग मिळत असून शहर स्वच्छतेसाठी पालिकेपुरती व कर्मचाऱ्यांपुरतेच स्वच्छ अभियान सिमीत नसून स्वतःहून नागरीकही स्वच्छतेत सहभागी होतात व आपले शहर स्वच्छ करणाऱ्या स्वच्छताकर्मींचा सन्मान करतात हेच या उपक्रमातून दाखवून दिले आहे. नागरीकांच्या चांगल्या प्रतिसादामुळेच नवी मुंबई शहर  देशात स्वच्छतेत  आणखी वरच्या स्थानावर जाण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राजेंद्र सोनावणे, मुख्य स्वच्छता अधिकारी ,नवी मुंबई महापालिका

आतापर्यंत स्वच्छतेसाठी पुढाकार

नागरीकांचा या उपक्रमात नागरीकांचा असा वाढतोय प्रतिसाद

वाशी- २००० नागरीक

नेरुळ- २५००

कोपरखैऱणे- ३०००

दिघा- ३८००

ऐरोली- ४३००

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 12500 citizens participated in the nmmc cleanliness initiative zws
First published on: 08-02-2023 at 21:53 IST