More than 9500 students painted picture of a clean Navi Mumbai nature park ysh 95 | Loksatta

निसर्ग उद्यानात ९५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी चितारले स्वच्छ नवी मुंबईचे चित्र

‘निश्चय केला – नंबर पहिला’ या ध्येय ठेवून नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी सज्ज झालेले आहे.

निसर्ग उद्यानात ९५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी चितारले स्वच्छ नवी मुंबईचे चित्र
निसर्ग उद्यानात ९५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी चितारले स्वच्छ नवी मुंबईचे चित्र

नवी मुंबई: ‘निश्चय केला – नंबर पहिला’ हे ध्येय ठेवून नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी सज्ज झालेले आहे. या अनुषंगाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१३’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातील निसर्ग उद्यानात स्वच्छ चित्रकला स्पर्धेत ९ हजार ५०० हुन अधिक विद्यार्थी चित्रकारांनी स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र रेखाटले आहे.

हेही वाचा >>> VIDEO ‘मराठी गाण्यांचीही फर्माईश पूर्ण करा’; नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा हॉटेल मालकांना मनसेचा दम; एकाला दिला चोप

  कोपरखैरणे से. १४  येथील निसर्गोद्यानामध्ये सकाळी ७च्या आधीपासूनच शाळानिहाय विद्यार्थ्यांचे समुह स्पर्धास्थळी रांगेने उपस्थित राहण्यास सुरुवात झाली होती. याठिकाणच्या मोकळ्या व निसर्गरम्य तसेच सकाळच्या वेळेतील काहीशा थंड वातावरणात विद्यार्थ्यांची ८ हजार इतकी अपेक्षित उपस्थिती वाढली आणि ९५०० हून अधिक विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धेकरिता माझे शहर – माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि ३आर (Reduce, Reuse, Recycle) हे ३ विषय देण्यात आले होते. या विषयांवर सहभागी विद्यार्थ्यांनी व चित्रकारांनी आपल्या मनातील स्वच्छ नवी मुंबईचे चित्र रेखाटले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ३ चित्रांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार असून १०० सर्वोत्तम चित्रांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रे प्रदान कऱण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 19:34 IST
Next Story
VIDEO ‘मराठी गाण्यांचीही फर्माईश पूर्ण करा’; नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा हॉटेल मालकांना मनसेचा दम; एकाला दिला चोप