scorecardresearch

Premium

लाखापेक्षा अधिक नवी मुंबईकरांचा ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात सहभाग

सुप्रसिद्ध संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांनी उपस्थितांचा उत्साह वाढवित ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाअंतर्गत वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो ज्येष्ठ नागरिकांसमवेत आयोजित केलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

Swachhta Hi Seva
लाखापेक्षा अधिक नवी मुंबईकरांचा 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमात सहभाग (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

‘निश्चय केला, नंबर पहिला’ अशी स्वच्छता जिंगल गात स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड अँबेसेडर, सुप्रसिद्ध संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांनी उपस्थितांचा उत्साह वाढवित ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाअंतर्गत वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो ज्येष्ठ नागरिकांसमवेत आयोजित केलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

याप्रसंगी पद्मश्री शंकर महादेवन यांच्या समवेत ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक, बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे, पालिका आयुक्त राजेश नार्वेकर महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक नवनाथ वाठ, विभागाचे उपआयुक्त डॉ. श्री अधिकारी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasekhar Bawankule in Ichalkaranji
समाज घटकांनी भाजपशी सामावून घ्यावे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे इचलकरंजीत आवाहन
Sarpanch, village development officer Songir dhule suspended embezzlement case
अपहार प्रकरणी धुळे जिल्ह्यात सरपंच, ग्रामविकास अधिकारी निलंबित
raj thackeray wife sharmila thackeray, sharmila thackeray spit free road campaign, udayanraje bhosle spit free road campaign
सांगवीतील विद्यार्थ्यांचे गणेशोत्सवानिमित्त ‘थुंकी मुक्त रस्ता अभियान’; शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, प्रसाद लाड यांचा अभियानाला पाठिंबा
Anganwadi recruitment Chandrapur
चंद्रपूर : भरती रद्द करा! ५३३ अंगणवाडी सेविकांच्या भरतीत अर्थकारणाचा आरोप

हेही वाचा – नवी मुंबई : स्वच्छता मोहिमेत पोलीस विभागाने नोंदवला उत्स्फूर्त सहभाग

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसह एकूण ७७५ हून अधिक नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला त्याचप्रमाणे वाशी येथील मिनी सी शोअर जुहूगाव चौपाटी परिसरात २५५ तृतीयपंथी नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवून नवी मुंबईच्या स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग असे नवी मुंबईच्या एकतेचे दर्शन घडविले. नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये, उद्याने, स्टेशन, डेपो, मार्केट, आरोग्य केंद्रे, नाला परिसर, पडीक जागा अशा महानगरपालिकेने निश्चित केलेल्या २६७ ठिकाणी तसेच इतर शासकीय व खाजगी कार्यालये, सोसायट्या, संस्था यांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमांमध्ये १ लाख २८ हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत स्वच्छतेविषयी जागरूकतेचे व नवी मुंबईच्या एकात्मभावाचे दर्शन घडविले.

टीएस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातील सागरी किनाऱ्याशेजारील खारफुटी परिसरात आयकर विभागाच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेत मुख्य आयकर आयुक्त संजय कुमार यांच्या समवेत अभिनेते राजकुमार राव, आयकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी उत्साही सहभाग घेतला.

नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिले असून पंतप्रधान महोदयांनी संपूर्ण राष्ट्राला केलेल्या आवाहनानुसार, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी आजची मोहीम ही व्यापक लोकचळवळ व्हावी या व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार शहरात मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत लाखो नवी मुंबईकर नागरिक रस्त्यावर उतरून स्वच्छतेसाठी श्रमदान करताहेत यातून आपल्या शहराच्या एकीची शक्ती दिसून येते, असे मत पद्मश्री शंकर महादेवन यांनी व्यक्त करीत या स्वच्छतेच्या सवयीचा प्रत्येक नागरिकाने कायमस्वरूपी अंगिकार करावा असे आवाहन केले.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने देशातील निवडक ठिकाणांवर केंद्रीय पथकाने येऊन छायाचित्रीकरण केले त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील मुंबई आणि नवी मुंबई या दोनच शहरांचा समावेश होता ही आपल्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे मत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले. संपूर्ण नवी मुंबई शहरात महानगरपालिकेने निश्चित केलेली २६७ ठिकाणे याशिवाय नवी मुंबईतील विविध शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये, संस्था, सोसायट्या, नागरिकांचे समुह यांनीही आपापल्या स्तरावर स्वच्छतेसाठी श्रमदान केले. याबद्दल समाधान व्यक्त करीत आयुक्त महोदयांनी सव्वालाखाहून अधिक नवी मुंबईकर नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने ठिकठिकाणी सहभागी होत नेहमीप्रमाणेच विक्रमी प्रतिसाद दिला. मुंबईकर नागरिकांची ही एकजूटच आपल्याला प्रेरणा देते.

शाळा, महाविद्यालये, उद्याने, स्टेशन, डेपो, मार्केट, आरोग्य केंद्रे, नाला परिसर, पडीक जागा अशा तब्बल २६७ ठिकाणी संपन्न झालेल्या या स्वच्छता मोहिमेचे आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाने सूक्ष्म नियोजन केले होते. याकरिता प्रत्येक स्वच्छता स्थळासाठी एका समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली होती. सफाई करण्यापूर्वीच्या स्थितीची छायाचित्रे, सफाई करतानाची छायाचित्रे व सफाई झाल्यानंतरची छायाचित्रे व व्हिडिओ लघुचित्रफिती काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याबाबत सर्व समन्वयकांचे रिसतर प्रशिक्षण घेण्यात आले होते. या समन्वयकांनी जिओ टॅगींगसह काढलेली छायाचित्रे केंद्रीय वेबपेजवर अपलोड करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज तत्काळ कृती कक्ष स्थापन केला होता. इतर शहरांच्या तुलनेत स्वच्छता मोहिमेची ठिकाणे नवी मुंबईत खूप जास्त असल्याने आणि केंद्रीय वेबपेजवर छायाचित्रे व व्हिडिओसह माहिती अपलोड करण्याची निर्धारित वेळ असल्याने याविषयी पूर्ण खबरदारी घेत पूर्वनियोजन करण्यात आले होते.

हेही वाचा – पनवेल परिसर, उपजिल्हा रुग्णालय आणि सिडको भवनामध्ये स्वच्छता मोहीम

नुकतेच १७ सप्टेंबरला महापालिका क्षेत्रातील आठ प्रशासकीय विभागांत १ लाख १४ हजार इतक्या मोठ्या संख्येने नवी मुंबईकर नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली, ज्याची विक्रमी नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली. त्यानंतर लगेचच हा उपक्रम संपन्न होत असल्याने नवी मुंबईकर नागरिकांचा प्रचंड उत्साह संपूर्ण नवी मुंबईत रस्तोरस्ती दिसून आला. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आबालवृद्ध उत्स्फुर्तपणे शहर स्वच्छतेचा ध्यास घेऊन या उपक्रमात सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

अनेक नागरिकांनी आपापल्या क्षेत्रात गटागटाने जमून स्वच्छता मोहिमा राबविल्या. यामध्ये मुली, युवती व महिलांची संख्याही लक्षणीय होती. विशेष म्हणजे मिनी सी शोअर वाशी येथे २०० हून अधिक तृतीयपंथी नागरिकांनी खाडीकिनारी स्वच्छता मोहीम राबवित सक्रिय सहभाग घेतला. ज्याची विशेष नोंद केंद्रीय पथकामार्फत घेण्यात आली.

संपूर्ण नवी मुंबई शहरातील नागरिकांना स्वच्छतेच्या धाग्याने जोडणारा हा उपक्रम महानगरपालिकेने निश्चित केलेल्या २६७ जागा त्यासोबतच इतर संस्था, सोसायट्या, कार्यालये, स्थानिक नागरिक गट अशा साधारणत: ३०० हून अधिक ठिकाणी १ लाख २८ हजारहून अधिक नागरिकांनी एकजुटीने एकत्र येत १ तास श्रमदान करून यशस्वी केला. ही स्वच्छतेची सवय आम्ही कायम राखू आणि निश्चय केला, नंबर पहिला हे ध्येयवाक्य साध्य करण्यासाठी आचरणात आणू अशी प्रतिज्ञाच जणू नवी मुंबईकर नागरिकांनी श्रमदान करीत स्वकृतीतून दाखवून दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: More than one lakh navi mumbai people participate in swachhta hi seva initiative ssb

First published on: 01-10-2023 at 21:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×