पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर धोकादायक खड्डे

नवी मुंबई– मुंबईसह इतर पालिका हद्दीतील रस्तेही कॉंक्रीटीकरणाचे होत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई शहरातही शहराअंतर्गत रस्त्याचे चित्र दिवसेंदिवस बदलत आहे.काही ठिकाणी खडी व डांबरीकरणाचे रस्ते आता कॉंक्रीटचे होऊ लागले आहेत. तर शहरातील चौक कॉंक्परीटीकरण करण्याचा सपाटा पालिकेने लावलेला आहे.नुकताच महापालिका हद्दीतील शीव पनवेल महामार्गावरील  ४ उड्डाणपुल  एमएसआरडीसीकडून पालिकेकडे हस्तातरीत झाले आहेत. यातील वाशी उड्डाणपुलावरील मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडले आहेत.  त्यामुळे  मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर टोलनाक्याच्या पुढे असलेल्या वाशी उड्डाणपुलावरुन दुचाकी ,चारचाकी वाहन चालवताना कधीही अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता या खड्ड्यांची जबाबदारी पालिका कधी घेणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबईची जुहू चौपाटी स्वच्छतेपासून दुर्लक्षित ,निर्माल्यकलश धुळीने माखलेले; पालिकेकडून दोन वेळा स्वच्छता  विचाराधीन ?

वाशी उड्डाणपुलावर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांची डांबर व खडीच्या भुशाच्या मदतीने  तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. परंतू येथे डांबर व रेतीचे उंचवटे तयार झाले आहेत.उन्हाच्या प्रखर झळा व पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेले डांबर वितळून त्यात टाकलेली छोटी वाळू यामुळे या उड्डाणपुलावर डांबराचे उंचवटे तयार झाले आहेत. याच उड्डाणपुलावर एकाच मार्गिकेवर हे धोकादायक खड्डे आहेत. त्यामुळे केव्हाही या ठिकाणी दुचाकी व चारचाकी चालवताना मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.सहज न दिसणाऱ्या व  अचानक आलेल्या खड्ड्यांमुळे व डांबराच्या वितळण्यामुळे रस्त्यावर विविध आकाराचे उंचवडे तयार झाल्याने येथे गाडी घसरुन अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता पालिकेकडे उड्डाणपुलच हस्तातरीत झाला आहे तर त्यावरील खड्डयांची जबाबदारीही पालिकेची आहे.त्यामुळे लवकरात लवकर पालिकेने  या उड्डाणपुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची अपेक्षा वाहनचालक करत आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घसरण सुरू, नवीन कांद्याची आवक वाढली

वाशी उड्डाणपुलावर  पावसाळ्यात या मार्गावर खड्डे पडले होते. तेव्हा हा उड्डाणपुल एमएसआरडीसीकडे होता. त्यामुळे एमईपी या वाशी टोल कंपनीकडून वाशी उड्डाणपुलावर डांबर व वाळू मिश्रण करुन खड्डे बुजवण्यात येत होते.परंतू आता  मुंबईहून वाशी टोलनाका ओलांडून पुढे उड्डाणपुलावर आल्यावर अचनाक समोर येणाऱ्या उंचवड्यामुळे दुचाकीस्वार गाडी घसरुन पडत आहेत. त्यामुळे आता पालिकेने या उड्डाणपुलावरील रस्त्याबाबत खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे संबंधित महापालिकेच्या हद्दीतील उड्डाणपुल त्या त्या महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत.नवी मुंबई महापालिकेकडे  वाशी उड्डाणपुलासह इतर ३ असे ४ उड्डापुल हस्तातंरीत करण्यात आल्याने या उड्डापुलाची जबाबदारी पालिकेची आहे. त्यामुळे वाशी उड्डापुलावरील पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर झालेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबतची जबाबदारी पालिकेची असून याबाबत निविदा प्रक्रिया सुरु आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कार्यवाही करताय ते नाही. पण लवकरच या उड्डाणपुलावरील काम पालिकेकडून करण्यात येणार आहे.

संजय देसाई, शहर अभियंता ,नवी मुंबई महापालिका

चौकट- नवी मुंबई महापालिकेकडे वाशी उड्डाणपुल रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेची आहे.त्यामुळे पालिकेने या उड्डाणपुलावरील खड्डे व त्याची दुरुस्ती तात्काळ करणे आवश्यक आहे.

मंगेश शिंदे, वाहनचालक

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrdc handover vashi flyover to navi mumbai municipal corporation zws
First published on: 31-01-2023 at 20:17 IST