निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्यांवर तडीपारीची टांगती तलवार | Loksatta

निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्यांवर तडीपारीची टांगती तलवार

पोलीस उपायुक्त कार्याल्याने केलेल्या या कारवाईमुळे या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्यांवर तडीपारीची टांगती तलवार
स्वच्छ शहर नवी मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता राखण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यापुढे आव्हान(संग्रहित छायाचित्र )

नवी मुंबई : नवी मुंबईत मनपा निवडणुकीत उभे राहण्यास इच्छुक असणाऱ्या तिघांना तडीपार बाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस  उपायुक्त कार्याल्याने केलेल्या या कारवाईमुळे या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.करोना संसर्गामुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या त्यात श्रीमंत मनपा पैकी एक असलेल्या नवी मुंबई मनपाचाही समावेश आहे.

मात्र जानेवारी ते मार्च दरम्यान निवडणुका होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे असताना ऐरोलीतील दोन आणि रबाळे एमआयडीसीतील एका इच्छुकांवर तडीपार कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. यात एम.के.मडवी, नवीन गवते, आणि अन्नू आंग्रे या तिघांचा समावेश आहे. यात एमके मडवी आणि नवीन गवते हे दोन्ही माजी नगरसेवक असून त्या त्या परिसरातील  दबंगनेते समजले जातात. तर अन्नू आंग्रे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्या विरोधात संघटीत गुन्हेगारी सारखे अनेक गंभीर गुन्हे त्यांच्या विर्रोधात आहेत. मात्र ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्याच्या वरदहस्ताने राजकाणात प्रवेश त्यांनी केला आहे. तर नवीन गवते आणि एमके मडवी यांच्यावरही गंभीर गुन्हे असून दंगल करणे, शांततेचा भंग करणे, हाणामारी आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : स्टेशन शेजारील नाल्यात आढळला सडलेल्या अवस्थेत मृतदेह

निवडणूक प्रभाग आरक्षण परिस्थिती पाहून  नातेवाईक किवा स्वतः किवा दोन्ही निवडणुकीत भविष्य आजमावण्याची तयारी इतर इच्छुकांच्या  प्रमाणे हे सुद्धा करीत होते. या तिघात एमके मडवी यांनी तडीपार नोटीस बाबत पोलीस अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या कामी वारंवार अडथळा बनत असलेल्या व्यक्ती विरोधात तडीपारीची कारवाई केली जाते. या बाबतच एमके मडवी, अन्नू आंग्रे आणि नवीन गवते यांच्या विरोधात सध्या तरी कारणे दाखवा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवी मुंबई : स्टेशन शेजारील नाल्यात आढळला सडलेल्या अवस्थेत मृतदेह

संबंधित बातम्या

नवी मुंबई ते अलिबाग अंतर केवळ सव्वा तासात, बेलापूर ते मांढवा वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरू
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, बेलापूर – अलिबाग आता केवळ सव्वा तासात

व्हिडिओ

ताज्या बातम्या
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India New Zealand ODI Series: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात
गुजरात निवडणुकीसाठी जाणे हे अधिकृत काम आहे का?; न्यायालयाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना खडे बोल
‘अदानी’च्या अर्जावर प्रक्रिया सुरू; नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, पनवेल भागात वीज वितरण परवाना