संतोष जाधव
नवी मुंबई : केंद्र सरकार व राज्य शासनाने मूल्यवर्धित करात कपात केली असली तरी सध्या पेट्रोलचे व डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. एकीकडे करोनामुळे मागील दोन वर्षे आर्थिक कंबरडे मोडलेल्या नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असून पेट्रोल दरवाढीचा फटका बसत असताना दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय समोर आला आहे. शहरात पालिका एकूण २० चार्जिग स्थानके उभारणार असून नवी मुंबईतील ज्वेल ऑफ नवी मुंबईजवळील चार्जिग स्थानकाचे काम पूर्ण झाले असून पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर चार्जिग स्टेशनची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
पालिकेच्याच काही वाहनांचे चार्जिग करून पाहिले जात आहे. त्यामुळे काही दिवसांतच शहरातील पहिल्या इलेक्ट्रिक चार्जिग स्थानकाचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र व राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले असून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी सवलतही दिली जात आहे. पालिकेनेही अधिकाऱ्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे दररोज वाढणाऱ्या डिझेल तसेच पेट्रोलच्या किमती यामुळे सर्वच वाहतुकीसाठी खर्चाचा भार वाढला आहे. त्यामुळे महागाईत वाढ होत आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरात २० चार्जिग स्थानके उभारण्याचा निर्णय घेतला असून यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली. त्यात पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन यांची निविदा मंजूर करण्यात आली असून या कंपनीला कार्यादेश दिल्यानंतर सदर कंपनीने प्रत्यक्षात चार्जिग स्थानकाचे काम केले आहे. नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे पहिले चार्जिग स्थानक प्रत्यक्षात आले आहे. शहरात अशी २० चार्जिग स्थानके असून त्यासाठी पालिकेने सदर कंपनीने कामांना सुरुवातही करण्यात आली आहे. शहरातील बसस्थानके तसेच महत्त्वाच्या ठिकाणी ही चार्जिग स्थानके प्रत्यक्षात येणार आहेत. सदर कंपनीला केंद्र शासनाकडून फेम २ अंतर्गत योजनेतून अनुदानही दिले जाणार आहे. आपले वाहन चार्जिग करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीत सदर वाहनचालकाला अवधी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील या २० चार्जिग स्थानकात ठेकेदार कंपनीकडूनच कॅफेटेरिया, वॉशरूम उभारले जाणार आहेत. प्रत्येक चार्जिग स्थानकात ६ युनिट उभारले जाणार आहेत. सध्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील चार्जिग स्थानकात २ युनिट उभारण्यात आले आहेत. नागरिकांच्या प्रतिसादानुसार त्यात वाढ केली जाणार आहे. पुढील काही दिवसांतच या चार्जिग स्थानकाचा श्रीगणेशा केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
आधीच तोटय़ात असलेल्या पालिकेच्या परिवहन उपक्रमाला आर्थिक घरघर लागली आहे. केंद्र शासनाच्या फेम १ व फेम २ अंतर्गत परिवहनच्या ताफ्यात १८० बस दाखल झाल्या आहेत. त्यांच्या चार्जिगसाठीही शहरातील नव्याने तयार करण्यात येत असलेल्या स्थानकांचा उपयोग होणार आहे.
नवी मुंबईत पालिकेच्या पहिल्या वाहन चार्जिग स्थानकाची चाचपणी सुरू
महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले असून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी सवलतही दिली जात आहे. पालिकेनेही अधिकाऱ्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे दररोज वाढणाऱ्या डिझेल तसेच पेट्रोलच्या किमती यामुळे सर्वच वाहतुकीसाठी खर्चाचा भार वाढला आहे. त्यामुळे महागाईत वाढ होत आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरात २० चार्जिग स्थानके उभारण्याचा निर्णय घेतला असून यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली. त्यात पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन यांची निविदा मंजूर करण्यात आली असून या कंपनीला कार्यादेश दिल्यानंतर सदर कंपनीने प्रत्यक्षात चार्जिग स्थानकाचे काम केले आहे.
नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे पहिले चार्जिग स्थानक प्रत्यक्षात आले आहे. शहरात अशी २० चार्जिग स्थानके असून त्यासाठी पालिकेने सदर कंपनीने कामांना सुरुवातही करण्यात आली आहे. शहरातील बसस्थानके तसेच महत्त्वाच्या ठिकाणी ही चार्जिग स्थानके प्रत्यक्षात येणार आहेत. सदर कंपनीला केंद्र शासनाकडून फेम २ अंतर्गत योजनेतून अनुदानही दिले जाणार आहे.
आपले वाहन चार्जिग करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीत सदर वाहनचालकाला अवधी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील या २० चार्जिग स्थानकात ठेकेदार कंपनीकडूनच कॅफेटेरिया, वॉशरूम उभारले जाणार आहेत. प्रत्येक चार्जिग स्थानकात ६ युनिट उभारले जाणार आहेत. सध्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील चार्जिग स्थानकात २ युनिट उभारण्यात आले आहेत. नागरिकांच्या प्रतिसादानुसार त्यात वाढ केली जाणार आहे. पुढील काही दिवसांतच या चार्जिग स्थानकाचा श्रीगणेशा केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
आधीच तोटय़ात असलेल्या पालिकेच्या परिवहन उपक्रमाला आर्थिक घरघर लागली आहे. केंद्र शासनाच्या फेम १ व फेम २ अंतर्गत परिवहनच्या ताफ्यात १८० बस दाखल झाल्या आहेत. त्यांच्या चार्जिगसाठीही शहरातील नव्याने तयार करण्यात येत असलेल्या स्थानकांचा उपयोग होणार आहे.
नवी मुंबई शहरातील ज्वेल् ऑफ नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रिक चार्जिग स्थानक सुरू करण्यासाठी याठिकाणी वाहनांची चार्जिग करण्याची चाचपणी सुरू करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्याच काही वाहनांचे ट्रायल बेसवर चार्जिग केले जात आहे. – सागर कुंभार, तंत्रज्ञ, पॉवर ग्रिड कंपनी
शहरात २० चार्जिग स्थानके उभारली जात असून ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील चार्जिग स्थानकात चाचणी स्वरुपात पालिका वाहनांचे चार्जिग केले जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठय़ा प्रमाणात व्हावा यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील पहिले इलेक्ट्रिक चार्जिग स्थानक काही दिवसांतच सुरू होईल. – योगेश कडुस्कर, उपायुक्त, परिवहन विभाग