नवी मुंबई : नवी मुंबई हि राज्यातील सर्वात श्रीमंत महानगर पालिकेपैकी एक समजली जाते. या ठिकाणी असणारी उद्याने या शहराची शान आहेत. मात्र उद्यानांची काळजी घेणारे माळी कामगारांना वेतन देण्यास कंत्राटदार टाळाटाळ करीत असून मनपा अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात त्यांनी भीक मांगो आंदोलन केले. 

हेही वाचा <<< गेल (इंडिया)च्या उरण ते उसर वायू वहिनीला शेतकऱ्यांचा विरोध; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना साकडे

हेही वाचा <<< नवीन पनवेलचा जिवघेणा उड्डाणपुल

नवी मुंबई मनपाच्या वाशी तुर्भे नेरुळ, येथील उद्यानात काम करणाऱ्या माळी कामगारांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. गणेशोत्सव निमित्त ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत वेतन देण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते मात्र लाल फितीच्या कारभार या आदेशांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे याच प्रमाणे ऐरोलीतही कामगारांचे वेतन देण्यात आले नव्हते मात्र त्यांनी मुख्यालयाबाहेर तब्बल चार वेळा आंदोलन केल्या नंतर त्यांना वेतन देण्यात आले त्यामुळे आता वेतनासाठी काम सोडून दर वेळी आंदोलन करायचे का असा सवाल माळी कामगारांनी विचारला आहे. त्यामुळे आता  वाशी तुर्भे नेरुळ नोड  मधील माळी कामगारांनी भीक मांगो आंदोलन केले आहे. आंदोलन वेळी शंभरच्या आसपास कामगार उपस्थित होते. वाशी विभाग ७३, नेरुळ विभाग ६०, तुर्भे विभाग ३५ एवढे कामगार वेतनापासून वंचित आहेत तर याला जवाबदार असलेले एन के शहा, जय भवानी इंटरप्राइजेश आणि डी .एम इंटरप्राइजेस हे कंत्राटदार आहेत असा आरोप कामगारांनी केला. 

हेही वाचा <<< नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारणी बरखास्त नवनियुक्त अध्यक्षांचा निर्णय

मंगेश लाड (अध्यक्ष:समाज समता कामगार संघ): माळी कामगारांना एक दिवस जरी वेतन उशिरा मिळाले तर त्यांचे हाल सुरु होतात अशात आता १६ दिवस उलटले. स्वतः आयुक्तांच्या आदेशाला अधिकारी जुमानत नसतील तर कामगार दूरच. आज भीक मांगो आंदोलन केले आहे जर वेतन देण्यात आले नाही तर आयुक्त अभिजित बांगर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले जाईल.