scorecardresearch

नवी मुंबई : मॉरिशसच्या आरोग्यमंत्र्याकडून महापालिका रुग्णालय व्यवस्थापनाची प्रशंसा

रूग्णालयात कार्यान्वित असलेल्या ई- हॉस्पिटल व आयुष सेंटरची पाहणी करीत व्यवस्थापन प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त केले.

नवी मुंबई : मॉरिशसच्या आरोग्यमंत्र्याकडून महापालिका रुग्णालय व्यवस्थापनाची प्रशंसा

नवी मुंबई : मॉरिशसचे आरोग्यमंत्री डॉ. कैलाशकुमार सिंग जगुतपाल व त्यांचे अधिकारी भारतातील विविध शहरांमधील खाजगी व शासकीय रूग्णालयांना भेटी देऊन तेथील ई हॉस्पिटल व आयुष सेंटरची पाहणी करीत असून त्याची कार्यप्रणाली जाणून घेत आहेत. यामध्ये त्यांनी टाटा व अपोलो या खाजगी रूग्णालयांनाही भेटी दिल्या व पाहणी केली. त्याच बरोबर त्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयालाही भेट दिली. यावेळी रूग्णालयात कार्यान्वित असलेल्या ई- हॉस्पिटल व आयुष सेंटरची पाहणी करीत व्यवस्थापन प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त केले.

हेही वाचा >>> महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणे पडले महागात; गुन्हा दाखल

या भेटी दरम्यान मॉरिशसच्या आरोग्य मंत्र्यांनी मॉरिशस देशाची लोकसंख्या १२.७ लाख इतकी असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या १५ लाखाहून अधिक असूनही डिजिटायझेशनमुळे व त्याचा सुयोग्य वापर होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात रूग्णांच्या गर्दीचे नियोजन व्यवस्थित होते असा अभिप्राय देत रूग्णालय व्यवस्थापनाची प्रशंसा केली. त्यासोबतच विशेषत्वाने रूग्णालयात एवढी गर्दी असूनही तेथील स्वच्छतेची नोंद घेत विशेष कौतुक केले.

हेही वाचा >>> पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई शहर स्वच्छ आहेच त्यासोबतच येथील रूग्णालयेदेखील स्वच्छ आहेत असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. या भेटीत त्यांनी रूग्णालयातील ब्लड बँक, ट्रामा सेंटर येथेही भेट देत पाहणी केली व नमुंमपा रूग्णालयातील कामकाजच्या पध्दतीने प्रेरीत झालो असल्याचे अभिप्राय दिले. भारताचे प्रधानमंत्री यांच्या भेटीत नमुंमपा रूग्णालयात राबविण्यात आलेल्या ई-हॉस्पिटल कार्यप्रणालीबाबत चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 16:15 IST

संबंधित बातम्या