scorecardresearch

Premium

नवी मुंबई : अल्प मानधन वाढीमुळे महापालिका शिक्षकांमध्ये असंतोष; आंदोलनाचा इशारा

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षकांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पगारवाढीसाठी आमरण उपोषण सुरु केले होते.

Municipal Teachers protest NMMC Ganapati vacation low pay rise
अल्प मानधन वाढीमुळे महापालिका शिक्षकांमध्ये असंतोष; आंदोलनाचा इशारा (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या ठोक मानधनावरील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पगारवाढीसाठी आमरण उपोषण सुरु केले होते.

school student, education department, students of private aided schools, education
खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय….
model degree college buldhana, 83 crores sanctioned for model degree college buldhana
बुलढाणा : ‘मॉडेल डिग्री’ महाविद्यालयासाठी ८३ कोटी मंजूर; उपकेंद्र कार्यान्वित होण्याची चिन्हे
Soham Suresh Uik
थेट सीईओंच्या खुर्चीत बसला, पोलीस अधीक्षकांनी कार्यालयात बोलवून स्वागत केले; असं काय केलं सोहमने, वाचा…
Chandrapur sp pardeshi
चंद्रपूर : आठ तास अभ्यास, आठ तास झोप, मित्रांसोबत गप्पा आणि..; पोलीस अधीक्षक परदेशी आणि विद्यार्थ्यांमध्ये रंगल्या आयएएस होण्याच्या गप्पा

अनेक वर्षापासून महापालिकेत शिक्षक म्हणून काम करत असताना वारंवार वेतनवाढीची मागणी करुनही पालिका प्रशासनाकडून आश्वासन दिले जात होते. ठोक मानधनावरील शिक्षकांनी २५ जुलैलाही मानधनवाढीसाठी आंदोलन केले होते. परंतु पालिका प्रशासनाने माध्यमिक शिक्षकांना २५०० रुपये, प्राथमिक शिक्षकांना २००० रुपये, बालवाडी शिक्षकांना १५०० व बालवाडी मदतनीस यांना १२०० रुपये मानधनवाढ केली आहे.

हेही वाचा… नवी मुंबई : विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल

या तुटपंज्या मानधनवाढी विरोधात ठोक मानधनावरील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी असून आमच्या तोंडाला पाने पुसली असल्याची भावना व्यक्त करत गणपती सुट्टीनंतर पालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्याचा विचार असून प्रशासनाने दिलेली तुटपुंजी पगारवाढ स्वीकारणार नसल्याची माहिती ठोक मानधन शिक्षकांचे प्रतिनिधी कृष्णा राठोड यांनी लोकसत्ताला दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Municipal teachers are going to protest against the nmmc after the ganapati vacation due to low pay rise dvr

First published on: 20-09-2023 at 12:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×