scorecardresearch

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २३ येथे अनधिकृत बांधकामावर पालिकेची तोडक कारवाई

नेरुळ सेक्टर २३ येथे वी मुंबई याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे काम करण्यात आलेले होते. याबाबत महापालिकेने संबंधितांना नोटीसही बजावली होती.

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २३ येथे अनधिकृत बांधकामावर पालिकेची तोडक कारवाई
नेरुळ सेक्टर २३ येथे अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अे विभाग बेलापूर कार्यालयांतर्गत प्लॉट नं. ५८ से. २३ दारावे गांव नवी मुंबई याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे काम करण्यात आलेले होते. त्यामुळे येथील बांधकामावर महापालिकेने तोडक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- कडाक्याच्या थंडीने अंजीर उत्पादन घटले

सदर अनधिकृत बांधकामास अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटवणे आवश्यक होते. परंतु त्यांनी सदर अनधिकृत बांधकाम हटविले आहे. या अनधिकृत बांधकामावर ए विभाग बेलापूर कार्यालयामार्फत विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी ए विभाग बेलापूर कार्यालयामधील अधिकारी, कर्मचारी, १० मजूर, गॅस कटर, १ इलेक्ट्रीक हॅमर यांच्या मदतीने तोडक कारवाई करण्यात आल्याची माहिती विभाग अधिकारी मिताली संचेती यांनी लोकसत्ताला दिली. यावेळी अतिक्रमण विभागाकडील पोलीस व्यवस्था तैनात करण्यात आले होते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 19:06 IST

संबंधित बातम्या