नवी मुंबई : क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी चार जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : महापालिकेचे ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालय नवजात शिशूंसाठी ठरतंय वरदान

gangster fired on police during chasing
मुळशीतील मुठा गावात थरार ; गुंड नवनाथ वाडकरकडून पोलिसांवर गोळीबार
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
What Ram Satpute Said?
“सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना १२ अतिरेक्यांना वाचवलं”, राम सातपुतेंचा गंभीर आरोप

हेही वाचा – रागाच्या भरात महिलेची हत्या, पोलिसांनी आरोपीला नेपाळ-भारत सीमेवर केली अटक

अब्दुल करीम फतेमोहंमद मनिहार, आसिफ शफिक शेख,  सिकंदर मोहन राजभर, कैफ मोबीन राईन, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ८ फेब्रुवारीला कांदा-बटाटा मार्केटसमोर फुटपाथवर इसम संतोष वायदंडे या वीस वर्षीय तरुणास अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारले म्हणून मृत इसमाची आई निला गणपत वायदंडे यांनी गुन्हा नोंद केला होता. याचा तपास एपीएमसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या  मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. सदर गुन्ह्यात कोणताही पुरावा नसतांना घटनास्थळ परिसरातील १५ सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच मोबाईल डेटाचे विश्लेषण करण्यात आले. सर्व तांत्रिक बाबींचे सखोल विश्लेषण करून तसेच काही माहितीगार यांच्याकडून माहिती उपलब्ध करून दाखल गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून तुर्भे येथे आरोपींना राहत्या घरातून अटक करण्यात आली. सर्व आरोपी हे उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहेत.