ठाणे – संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ३१ अ प्रमाणे स्थायी समिती, परिवहन समितीच्या निवडणुका संख्याबळानुसार घ्याव्या असा कायदा आहे. त्या पद्धतीने नगरपालिका, महानगरपालिका असतील विविध समित्यांमधील सदस्यत्व ही संख्या बळानुसार घेण्यात आलेल्या आहेत.
विभागीय आयुक्तांकडे गटनेता जाहीर करणं पक्षाची संख्या जाहीर करणे या सर्व प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहेत. त्यानुसार, ही प्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिकेतही लागू झालेली आहे. परंतु, नवी मुंबईत ‘हम करेसो कायदा’ करण्याच्या दृष्टीने कारभार सुरू असल्याची टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
नवी मुंबईत गेले दोन दिवसांपासून काही लोक विचित्र आणि बेकायदेशीर पद्धतीने कृती करण्याच्या विचारात आहेत, अशी चर्चा सुरु आहे. त्याला महानगरपालिकेच्या सचिव विभागाच्या कृतीमुळे दुजोरा मिळत असल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, २०१७ साली सुद्धा अशा पद्धतीने कृती करण्यात आली होती. परंतू, नगर विकास खात्याने त्याला स्थगिती दिली. आता पुन्हा हाच प्रकार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रशासनातील सचिव विभागाच्या ज्या सचिव आहेत त्या सुद्धा याला प्रोत्साहित करत असून त्याला मदत करताना दिसत आहेत. कायद्यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की स्थायी समिती, परिवहन समिती असेल यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन करताना महापालिकेतील पक्षांच्या किंवा गटांच्या संख्याबळाच्या प्रमाणात सदस्यांचे नामनिर्देशन करीत असा कायदा आहे. विभागीय आयुक्तांकडून प्रत्येक पक्षाची किती नगरसेवक आहेत ही संख्यांचा पत्र सुद्धा महानगरपालिकेने गेलेले आहे.
परंतु, १० फेब्रुवारीला त्या सचिवांनी एक पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये स्थायी समिती असेल तुमचं स्वीकृत सदस्य असतील नामनिर्देशित सदस्य आणि परिवहन समितीची सदस्य हे कशा पद्धतीने निवडले जातील हे सुद्धा पत्र आमच्या गटनेत्याला दिले. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले की परिवहन समितीला १११ भागिले १२ म्हणजे ९.२५ चा कोटा निश्चित केलेला आहे. त्यानुसार, आमचे पाच सदस्य परिवहन समितीला जातील. परंतु दोन दिवसांमध्ये आणखी एक पत्र त्यांनी काढलं की जर काही विशेष घडलं तर हात वरती करून निवडणुका घेण्यात येतील. हे चुकीचे पत्र त्यांनी कोणाच्या तरी दबावाखाली काढले असून त्याचा विरोध आम्ही केलेला आहे, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.
कायद्यापेक्षा कोण मोठं नाही…
नवी मुंबई महापालिका ही महाराष्ट्रात आहे. कायद्यानुसार ही नवी मुंबई महानगरपालिका चालते बेकायदेशीर रित्या जर आपण काही कृती करणार असाल तर आम्ही याला विरोध करू अशा पद्धतीचं काम करता येणार नाही. आयुक्तांनाही हेच सांगणे आहे की, कायद्यापेक्षा कोण मोठं नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असतील महानगरपालिका असतील त्या निवडणुकींच्या पद्धतीने झाल्या त्याच पद्धतीने सदस्यांच्या निवडणुका व्हायला पाहिजेत हात वरती करून जे काही तुम्ही ओळ टाकलेली आहे. ती चुकीची आहे.
संविधानाच्या विरोधात जाऊ नका
निवडणुकांमधील घोडेबाजार रोखावा घोडेबाजार होऊ नये म्हणून हा जो काही कायदा केला त्या कायद्यामध्ये स्पष्ट लिहिल आहे की, घोडेबाजार रोखण्याकरिता आम्ही या कायद्यामध्ये बदल करत आहोत आज शासनाने केलेला कायदा आहे. संविधानाच्या विरोधात जाण्याचे प्रयत्न करू नका असा इशारा देखील नरेश म्हस्के यांनी दिला आहे. जर संविधानाच्या विरोधात गेलात तर, शिवसेना प्रचंड ताकदी निशी त्याला विरोध करेल असेही ते म्हणाले.
सचिव म्हणून ज्याला कायदा कळतो असा सचिव बसवा
ज्याला सचिव म्हणून महानगरपालिकेचा कायदा कळतो अशा सचिवाला त्या जागेवर बसवणे गरजेचं आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये तीन वेळा वर्तमान पत्रात जाहिराती देऊन त्यामागे घेण्याचा वेळ या नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनावर आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की कोणीतरी त्यांच्यावरती नियमाच्या विरुद्ध वागण्यासाठी दबाव टाकतोय किंवा त्या सचिवांना महापालिका प्रशासनाबद्दल कारभार कसा चालवायचा याचं कळत नाही, असे म्हस्के म्हणाले.
