अरुंद, खड्डेमय रस्त्यांमुळे कळंबोलीतील वाहतूक समस्या

कळंबोली आणि वाशी सर्कलची वाहतूक कोंडी ही मोठी समस्या असून याला अरुंद व खड्डेमय रस्ते कारणीभूत आहेत.

सिडको, पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा पोलीस आयुक्तांचा सल्ला

पनवेल : कळंबोली आणि वाशी सर्कलची वाहतूक कोंडी ही मोठी समस्या असून याला अरुंद व खड्डेमय रस्ते कारणीभूत आहेत. त्यासाठी उड्डाणपूल, सबवे अशा सुविधांची गरज आहे. मात्र याबाबत नागरिकांचा रोष हा नेहमीच पोलिसांवर असतो. मात्र सिडको व इतर सरकारी यंत्रणांकडे नागरिक व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार यांनी सांगितले.

आयुक्त बिपिनकुमार यांनी गुरुवारी कळंबोली पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी ते बालत होते. नागरिक आणि पोलीस यांच्यातील सलोख्यामुळेच अनेक प्रश्न सुटू शकतात आणि शहर शांत राहण्यात आणि तेथील विकास होण्याचा वेगही चांगला राहतो. राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. मात्र नवी मुंबई शांत आहे. याचे सर्व श्रेय नवी मुंबईकरांचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

पोलीस उपायुक्त शिवराज यांच्यासह  कळंबोलीतील निवडक व्यापारी, प्रतिष्ठीत नागरीक आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी पोलीस ठाणे, साहाय्यक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्त कार्यालयात जाऊनही सुटत नसल्यास नागरिक स्वत: आयुक्त कार्यालयात कामाकाजाच्या दिवशी सायंकाळी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान भेटून तक्रारी देऊ  शकतात. यापुढे पोलीस ठाण्याच्या स्तरावर नागरिकांच्या भेटी घेणार आहेत.

बिपिनकुमार, पोलीस आयुक्त, नवी मुंबई.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Narrow roads traffic problems kalamboli ysh

Next Story
सिडकोकडून भूमिपुत्रांवर अन्याय
ताज्या बातम्या