नवी मुंबई : पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे एकाच ठिकाणी गांजा विकणे धोकादायक झाल्याने आता गांजा विक्रेते फिरस्तीप्रमाणे रोज जागा बदलून गांजा विकतात. असाच एक प्रकार समोर आला असून बस थांब्यावर गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.
समशेर पीर खान, दिलीप बरुआ असे अटक आरोपींची नावे असून संजू उर्फ मोट, शम्मो, वसीम हे फरार आरोपी आहेत. गांजा विक्रीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी नशा मुक्त नवी मुंबई हा उपक्रम राबवत असल्याने गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे गांजा विक्री करण्यासाठी रोज जागा बदलली जात असल्याने पोलिसांनी त्यावरही नजर ठेवणे सुरु केले आहे. बदलेली जागा गांजा खरेदी करणाऱ्यांना मात्र माहिती असते. अशाच प्रकारे गांजा विक्री करण्यासाठी ऐरोलीतून मुलुंडकडे जाणाऱ्या गरम मसाला बस थांब्यावर गांजा विकणारे दोन संशयित पोलिसांना आढळून आले. दोघांना ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांच्याकडे २० हजार रुपयांचा १ किलो गांजा आढळून आला.
हेही वाचा – धान्य बाजारात दुकानदारांचे रस्त्यावर बस्तान
हेही वाचा – पनवेलमध्ये सकाळपासून कोकण पदवीधरांचे उत्साहात मतदान
काडीदार पाने, बिया फुले पाने अशा स्वरुपात सदर गांजा होता. सदर गांजा खरेदी आणि विक्रीसाठी संजू उर्फ मोट, शम्मो, वसीम हे आरोपींना मदत करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी समशेर आणि दिलीप यांना अटक केली असून अन्य तिघांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दयानंद वणवे हे तपास करीत आहेत.
© The Indian Express (P) Ltd