Navi Mumbai Palm Beach Road Accident : दोन अवजड वाहनांच्या मधून दुचाकीवरून जात असताना दुचाकी घसरून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज (१३ जानेवारी) दोन युवतींचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन तरुणी कॉल सेंटरवरून रात्रपाळी करून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. यात एक युवती जागीच ठार झाली तर उपचार सुरू असताना दुसरीचा मृत्यू झाला. संस्कृती खोकले (वय २२) व अंजली पांडे (वय १९) अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवतींची नावे आहेत. सकाळी पावणे सातच्या दरम्यान आपली रात्रपाळी करून अंजलीला बोनकोडे गावात सोडण्यास संस्कृती येत होती. बोनकोडे जवळ असणाऱ्या वीरशैव स्मशान भूमीनजिक त्या आल्या असता समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघात झाल्यावर कारचालक त्यांची मदत न करता निघून गेला. यात दुचाकीचालक संस्कृती जागीच ठार झाली तर अंजलीला आसपासच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. प्राथमिक तापसानुसार समजलं आहे की त्या विरुद्ध दिशेने स्कूटर चालवत होत्या. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय उपाळे पुढील तपास करीत आहेत.

बोनकोडे गावाकडे जाणाऱ्या पाम बीच रोडवर स्कोडा कारने या तरुणींच्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात मरण पावलेली संस्कृती कामोठे सेक्टर १८ मधील रहिवासी होती. तर, अंजली कोपरखैरणेमधील बोनकोडे गावात राहत होती. तुर्भे एमआयडीसीमध्ये रात्रीची शिफ्ट संपवून या दोघी घरी जात होत्या. संस्कृती अंजलीला तिच्या घरी सोडून कामोठ्याला जाणार होती. मात्र, अंजलीला बोनकोडेला सोडण्यासाठी निघालेली संस्कृती पाम बीच रोडवर विरुद्ध मार्गावरून स्कूटर चालवत होती. त्याचवेळी एका स्कोडा कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात दोघी ठार झाल्या.

truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mumbai western expressway loksatta news
मुंबई : दुभाजक ओलांडून कारची बसला धडक; पश्चिम द्रुतगतीमार्गावर अपघात, कार चालकाचा मृत्यू
accident to Vehicle of devotees returning from Mahakumbh on Samruddhi Highway
‘समृद्धी’वर चालकाला लागली डुलकी, कुंभतून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!
Passenger's leg gets stuck in the door driver did not stop the bus
“माणूसकी मेली!”, दरवाज्यात अडकला प्रवाशाचा पाय, चालकाने थांबवली नाही बस, धक्कादायक घटनेचा Video Viral
Domino Effect Crash Sudden Scooty Brake Causes Multi-Vehicle Pileup Internet Reacts WATCH
“वो स्त्री है कुछ भी कर सकती है…” भररस्त्यात दुचाकीस्वार काकूंनी अचानक मारला ब्रेक, एकमेकांना धडकल्या मागून येणाऱ्या गाड्या, विचित्र अपघाताचा Video Viral
Traffic police officer beaten with slippers while taking action case registered against two women
कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण, दोन महिलांविरुद्ध गुन्हा
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…

हे ही वाचा > > PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण

पाम बीच रोडवर नेमकं काय घडलं?

संस्कृती खोकले अनेकदा अंजलीला घरी पोहोचवून तिच्या घरी जात होती. आजही त्या दोघी नेहमीप्रमाणे घरी निघाल्या होत्या. मात्र पाम बीच रोडवर त्यांचा अपघात झाला. त्यांना धडक देऊन कारचालक तिथून पळून गेला. त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. असे या दोन्ही मुलींचा कार्यालयातील सहकारी चिन्मय गढवी याने म्हटलं आहे. संस्कृतीने कोपरा पुलाजवळील सर्व्हिस रोडने पाम बीच रोडवर स्कूटर उतरवली. त्यानंतर ती बोनकोडे गावाकडे जाण्यासाठी आरंजा सर्कलवरून विरुद्ध दिशेने स्कूटर चालवत होती. त्याच वेळी एका स्कोडा कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली.

हे ही वाचा >> कुंडेवहाळ, बंबावीपाडा ग्रामस्थांचे आयुष्य ‘माती’मोल; खदाणींच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, प्रशासनाचे दुर्लक्ष

दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची माहिती देताना सांगितलं की स्कोडा कारचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला. आम्ही त्या कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारचा नंबर व त्या चालकाला शोधण्यासाठी आम्ही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चित्रित केलेलं फूटेज तपासत आहोत, असं एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितलं. सध्या अज्ञात आरोपीविरोधात कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) व १०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader