नवी मुंबई: नवी मुंबई सारख्या शहरात गांजा विक्री करण्यास आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. त्याच्या कडून दोन किलो १४२ ग्रॅम  गांजा जप्त करण्यात आला असून हि कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. 

नशा मुक्त नवी मुंबई या अभियानातंर्गत नवी मुंबई पोलीस विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक सतर्क असते. अशाच सतर्कतेने गांजा विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली आहे.     

Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
man molests 15 year minor girl in running local train
रेल्वेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

आणखी वाचा- नवी मुंबई: हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

भावेश मढवी असे अटक आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाला गांजा विक्री करण्यास एक इसम  तळोजा पाचनंद, भोईर पाडा, मेट्रो कारशेडच्या मागे, पेठाली गांव, तालुका पनवेल जिल्हा येथे असल्याची माहिती मिळाली. याच परिसरात आरोपी राहत असल्याचेही समोर आले. ही माहिती मिळताच या ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी आरोपीही पोलिसांच्या हाती सापडला. त्याच्या कडून ०२ किलो १४२ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ एकूण ४२ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.सय्यद यांनी दिली.