नेरुळ येथे एका आलिशान व्यावसायिक संकुलात सुरु असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लर वर कारवाई करण्यात आली आहे. यात दोन जणांना ताब्यात घेतले असून विविध फ्लेवरचे तंबाखू जन्य  जप्त करण्यात आले आहेत.नवी मुंबईत हुक्का पार्लर धंदा तेजीत असून पोलिसही कारवाई करत असतात. गुरुवारी रात्री नेरुळ येथील हावरे सेंच्युरियन मॉल  मध्ये असणाऱ्या पॉटरी पॉट हुक्का पार्लर सेक्टर १९ ए नेरुळ येथे हुक्का पार्लर मध्ये बेकायदेशीर असलेल्या विविध स्वादाच्या (फ्लेवर) तंबाखू जन्य पदार्थ हुक्क्यात दिले जात.

हेही वाचा >>> तळोजात हे चाललंय तरी काय? कारखानदारांकडून घेतला जातोय जल प्रदूषण करणाऱ्यांचा शोध

Thane municipal corporation, commissioner, action against illegal construction, Thane
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर हातोडा
employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव

अशी माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांनी पोलीस पथक पाठवले . त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार हुक्का बिनदिक्कत सुरु होता तसेच त्यात तंबाखू जन्य पदार्थ दिले जात होते. पोलिसांनी असा विविध प्रकारचे ७ डब्बे जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी व्यवस्थापक सागर तावरे आणि कामगार ऋत्विक दास यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ग्राहकांवर मात्र कारवाई करण्यात आली नाही.