scorecardresearch

पनवेल : देवाचा प्रसाद देण्याच्या बहाण्याने बालिकेवर अत्याचार

या प्रकाराने धक्का बसलेल्या पीडीत बालिका हादरुन गेली. तीने याबाबत पहिल्यांदा कोणालाही काही सांगीतले नाही

पनवेल : देवाचा प्रसाद देण्याच्या बहाण्याने बालिकेवर अत्याचार
प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता

सूकापूर येथील एका इमारतीमध्ये  ६० वर्षीय व्यक्तीने देवाचा प्रसाद देण्याच्या बहाण्याने एका ११ वर्षीय बालिकेवर अत्याचर केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिडीत बालिकेच्या वडीलांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या प्रकरणातील संशय़ीत आरोपी विश्वनाथ गिते याला अटक करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी संबंधित पिडीत बालिका घरी नाराज असल्याचे तीच्या पहिल्यांदी आईला दिसले. या नाराजीबाबत तीला कारण विचारल्यावर शेजारच्या आजोबांनी केलेल्या कथीत प्रकार सांगीतला. या प्रकाराने धक्का बसलेल्या आजोबांनी केलेल्या कृत्याबद्दल एक दिवस आईने ही बाब पिडीत बालिकेच्या वडीलांना सांगीतली नाही. मात्र दूस-या दिवशी बालिका शाळेत जात नसल्याने वडीलांनी विचारणा केल्यावर पिडीत बालिका व तीच्या आईने घडलेला प्रकार वडीलांना सांगीतला.

या प्रकरणानंतर संबंधित कुटूंबाने पोलीसांत धाव घेतली. पीडीत बालिका व गिते यांच्या घरातली नातवंडे एकत्र यापूर्वी खेळत होते. तीन दिवसांपूर्वी ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेस गीते यांनी इमारतीमधील सर्वांना घरी जाऊन प्रसाद दिला मात्र पिडीत बालिकेला स्वताच्या खोलीत कोणीही नसताना एकांतात नेले. त्यानंतर तीच्यासोबत अत्याचार केला. या प्रकाराने धक्का बसलेल्या पीडीत बालिका हादरुन गेली. तीने याबाबत पहिल्यांदा कोणालाही काही सांगीतले नाही. मात्र ती गप्प व नाराज बसल्याने तीच्या आईला संशय आला. आजोबांनी अशी विकृती केल्याने पीडीत बालिकेच्या वडीलांनी थेट खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूभाष कोकाटे यांच्याशी संपर्क साधला. पोलीसांनी तातडीने गीते याला अटक केली. गीतेवर विनयभंग, बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयासमोर ६० वर्षीय गिते याला हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे. सध्या खांदेश्वर पोलीस गीते याने यापूर्वी काही अश्लिल चाळे केले का याची चौकशी करत आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 09:55 IST

संबंधित बातम्या