scorecardresearch

नवी मुंबईत ६९ टक्के मुला-मुलींना लसमात्रा; शहरात १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरणाला प्रारंभ

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील लसीकरणास प्रारंभ झाला. शहरातील वाशी, नेरुळ, ऐरोली या पालिकेच्या रुग्णालयात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील लसीकरणास प्रारंभ झाला. शहरातील वाशी, नेरुळ, ऐरोली या पालिकेच्या रुग्णालयात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. शहरातील या वयोगटातील ४७ हजार ४५९ लसपात्र मुले असून त्यांच्यापैकी ३२ हजार ८०४ म्हणजेच ६९ टक्के मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.
महापालिकेने सुरुवातीपासूनच लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केल्यामुळे १८ वर्षांवरील वयाच्या लसीकरणाचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे १०० टक्के उद्दिष्ट गाठणारी नवी मुंबई महानगरपालिकाही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. १६ मार्चपासून शहरातील १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणास प्रारंभ झाला असून या वयोगटातील लसीकरणास कमी प्रतिसाद प्राप्त होत आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारी २०२२पासून सुरू करण्यात आले होते. १२ ते १४ या वयोगटासाठी लस घेण्यासाठी पात्र असलेली मुले ही १५ मार्च २००८ ते १५ मार्च २०१० या दरम्यानच्या काळात जन्म झालेल्या सगळय़ांना लस घेता येत आहे, अशी माहिती लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी दिली.
१२ ते १४ वयोगटाचे लसीकरण
४७४५९
शहरातील या वयोगटातील लसपात्र मुले
३२८०४
पहिला डोस घेतलेली मुले
६९.१२टक्के
टक्केवारी

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navi mumbai 69 percent boys girls vaccinated vaccination 12 to 14 year olds started city corona amy

ताज्या बातम्या