scorecardresearch

नवी मुंबई : एपीएमसीतील शौचालय वितरण घोटाळा, दोन कंत्राटदारांना अटक

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय वितरण घोटाळा प्रकरणी सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे.

navi mumbai APMC, apmc scam in distribution of toilets
नवी मुंबई : एपीएमसीतील शौचालय वितरण घोटाळा, दोन कंत्राटदारांना अटक (संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय वितरण घोटाळा प्रकरणी सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गुन्हा नोंद झालेल्या आरोपीत या दोघांची नावे नाहीत. दोन्ही आरोपींना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात असणाऱ्या शौचालय कंत्राटमध्ये शासनाचे ७ कोटी ६१ लाख ४९ हजार ६८९ रुपयांचे नुकसान झाल्याच्या आरोपा प्रकरणी माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या सह अन्य सात अशा एकूण आठ जणांच्या विरोधात ११ तारखेला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

हेही वाचा : सिडको वसाहतींमधील हिरवळ आणि डोंगरांगांचे दर्शन घडवत ‘खारघरची राणी’ निघाली

motorized garbage collection vehicle, strike of contract basis workers
चंद्रपूर : आता कचरा संकलन होणार मोटराइज्ड घंटागाडीने, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महापालिकेची व्यवस्था
medical hospital nagpur
मेडिकलमध्ये पर्याप्त औषध साठा, मग डॉक्टर चिठ्ठ्या का देतात? मनसेचा अधिष्ठातांना सवाल
onion
कांदा निर्यात शुल्कावर केंद्र ठाम; बैठकीची केवळ औपचारिकता
Shabari Gharkul Yojna, nashik agitation for shabari gharkul yojana, igatpuri agitation for shabari gharkul yojana
शबरी योजनेंतर्गत घरकुलासाठी आंदोलन; नाशिकसह इगतपुरीत ठिय्या आंदोलन

याबाबत कारवाई करीत सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना आज (शनिवारी) अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यात मारू आणि पाटील यांचा समावेश नाही . आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही २२ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुणावली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navi mumbai apmc toilet distribution scam 2 contractors arrested css

First published on: 18-11-2023 at 20:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×