नवी मुंबई : बिल्डर असोसिएशन आणि आर्किटेक्ट असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने दोन्ही असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आले.

ग्रामीण भागाच्या तुलनेत नागरी भागात मतदानाची कमी असलेली टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांचा वापर करून थेट जनतेपर्यंत पोहोचून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद

जनजागृतीपर बैठक नवी मुंबई बिल्डर असोसिएशन व नवी मुंबई आर्किटेक्ट असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित करण्यात आली होती. पालिका आयुक्तांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आपले सदस्य, कर्मचारी, कुटुंबीय व संपर्कात येणारे ग्राहक आणि नागरिक यांच्यापर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहचविण्यात यावा व प्रत्येकाने मतदान करावे यासाठी प्रोत्साहित करावे असे सांगितले. बिल्डर व आर्किटेक्ट यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे तसेच वेळेत सवलत द्यावी, असेही आयुक्तांनी सूचित केले.

महापालिका विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून नागरिकांना त्यांचा मतदार क्रमांक व मतदान केंद्राचे ठिकाण शोधणे सोपे जावे याकरिता त्यांच्यापर्यंत हस्तपत्रके पोहचविली जात असून प्रत्येक सोसायटीवर ही माहिती सहजपणे उपलब्ध होईल असा क्यू आर कोडदेखील पोस्टर्स स्वरूपात प्रसारित केला जाणार आहे.

हेही वाचा – उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

नवी मुंबई बिल्डर असोसिएशन आणि नवी मुंबई आर्किटेक्ट असोसिएशन यांनीही मतदानाचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने पार पाडावे याकरिता आपल्या स्तरावरून जास्तीतजास्त प्रचार व प्रसार करावा. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त नवी मुंबई महापालिका

Story img Loader