नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाशी एपीएमसी आणि रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या क्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. यात बेकायदा शस्त्र बाळगणारे, देशात अनधिकृतपणे राहणारे, फरार संशयित, अमली पदार्थ विरोधी कारवाई तसेच विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. यात एपीएमसी पोलीस ठाणे परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवार आणि कोपरी गाव येथील झोपडपट्टीत सर्वाधिक बेकायदा धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

काही दिवसांपूर्वी विधानसभा माजी आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील अमली पदार्थाचे धागेदोरे कृषी उत्पन्न बाजार समितीत असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. २ मे रोजी एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन केल्यावर अवैध रित्या भारतात राहणाऱ्या संशयित लोकांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली. १५० पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. यात एक व्यक्ती बांगलादेशी नागरिक असून अवैधरित्या तो घुसखोरी करून भारतात आल्याचे निष्पन्न झाले.

तुर्भे गाव, कोपरीगाव, जनता मार्केट, मॅफको मार्केट, फळ मार्केट, भाजी मार्केट, ए.पी.एम.सी. मार्केट परिसर, ग्रीन पार्क झोपडपट्टी, एकता नगर या ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. तपासणी करून १५० संशयिताना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी अद्याप सुरु आहे. ग्रीन पार्क झोपडपट्टीमध्ये एका महिलेच्या ताब्यातून एक लाख ९ हजार ४०० रुपयांचा ४ किलो ४४७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.

नाकाबंदीत वाहतूक नियम मोडणाऱ्या ४८ जणांवर दंडात्मक कारवाई केली गेली. रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत ३० एप्रिलला विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यात अब्दुल रहेमान यासीन लष्कर उर्फ सोहाग शहाजहाँ मुल्ला या अनधिकृत रित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली. वाशी पोलीस ठाणे क्षेत्र अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबईत कोम्बिंग ऑपरेशन टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यात कायदा हातात घेणाऱ्या अनेक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कायद्याचा वचक राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुशंघाने ही विशेष मोहीम राबवली जात आहे – पंकज डहाणे, पोलीस उपायुक्