नवी मुंबई: अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; कर्मचाऱ्यांना पदोन्नती व आश्वासित प्रगती योजना लागू |navi mumbai Commissioner Rajesh Narvekar Diwali gift to officers employees | Loksatta

नवी मुंबई: नवनिर्वाचित आयुक्तांची अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

२२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती व ६३ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे.

नवी मुंबई: नवनिर्वाचित आयुक्तांची अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
नवी मुंबई: अधिकारी, कर्मचाऱ्यांना नवनिर्वाचित आयुक्तांची दिवाळी भेट

मागील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदोन्नत्या तसेच आश्वासित प्रगती योजना लागू लवकरात लवकर करण्याची मागणी होत होती. नवनिर्वाचित आयुक्तांनी पदोन्नती समितीच्या कामाला विशेष गती देऊन महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. २२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती व ६३ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे.

नागरी सेवा सुविधांच्या पूर्ततेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचे सक्रीय योगदान लक्षात घेत त्यांच्या पदोन्नत्या, आश्वासित प्रगती योजनांचा लाभ याविषयी गतीमान निर्णय घेण्याकडे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फत विशेष लक्ष दिले जात आहे. पदोन्नती समितीने शिफारस केल्यानुसार महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी वरिष्ठ लिपिक (लेखा) या पदावरून १८ कर्मचाऱ्यांना उप लेखापाल / लेखा परीक्षक तसेच ४ उप स्वच्छता निरीक्षकांना स्वच्छता निरीक्षक या पदावर पदोन्नती देत त्यांना दिवाळी भेट दिलेली आहे. त्याचप्रमाणे १ शाखा अभियंता, १० जोडारी, ८ प्लंबर, १५ मदतनीस, ५ मीटर वाचक, ७ वायरमन, ७ माळी / बहुउद्देशीय सेवक व १० शस्त्रक्रियागृह सहाय्यक अशा एकूण ६३ अधिकारी, कर्मचारी यांना ३ लाभांचा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. यामध्ये विशेषत्वाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आलेला आहे.

हेही वाचा : नवी मुंबई – दिवाळीच्या सलग सु्ट्ट्यांमुळे ट्रॅफिक जॅम ; मानखुर्द ते वाशी टोलनाका दरम्यान प्रचंड कोंडी

मागील दीड वर्षात ३५ संवर्गात ३१५ अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नत्या झालेल्या आहेत. यामध्ये वरिष्ठ पदांपासून वर्ग ४ च्या पदांपर्यंत सर्व संवर्गांना न्याय देण्यात येत आहे. याशिवाय ५० संवर्गातील ५८३ अधिकारी, कर्मचारी यांना ३ लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-10-2022 at 13:39 IST
Next Story
नवी मुंबई – दिवाळीच्या सलग सु्ट्ट्यांमुळे ट्रॅफिक जॅम ; मानखुर्द ते वाशी टोलनाका दरम्यान प्रचंड कोंडी