navi mumbai crime news one killed over fight for money scsg 91 | नवी मुंबई : पैशाच्या वादातून पाठीत स्क्रू डायव्हर खुपसून ठेकेदाराची हत्या; घटनाक्रम CCTV मध्ये कैद | Loksatta

नवी मुंबई : पैशाच्या वादातून पाठीत स्क्रू डायव्हर खुपसून ठेकेदाराची हत्या; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

साधारण वर्षभरापूर्वी दोघेही एका अन्य कंपनीत कामाला असताना मयत व्यक्तीने आरोपीकडून ३० हजार रुपये उसणे घेतले होते,

नवी मुंबई : पैशाच्या वादातून पाठीत स्क्रू डायव्हर खुपसून ठेकेदाराची हत्या; घटनाक्रम CCTV मध्ये कैद
पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.

उसणे पैशांच्या वादातून कामगाराने ठेकेदाराची हत्या केल्याची घटना नवी मुंबईमध्ये ढली असून या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी आरोपीने मयत व्यक्तीस ३० हजार रुपये दिले होते. मात्र अनेकदा तगादा लावूनही पैसे देत नसल्याच्या रागातून कामगाराने ठेकेदाराची हत्या केली आहे. 

जयशंकर प्रसाद असे आरोपीचे नाव आहे. शिरवणे एमआयडीसीमधील शिशा साई प्रिंटिंग प्रेसमध्ये आरोपी आणि ठेकेदार दोघे कामाला होते. ठेकेदार नंदकिशोर सहानी सोबत पैशांच्या व्यवहारामधून झालेल्या वादामध्ये जयशंकरने नंदकिशोरची हत्या केली. पाठीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून नंदकिशोरची हत्या करण्यात आली.

साधारण वर्षभरापूर्वी दोघेही एका अन्य कंपनीत कामाला असताना मयत व्यक्तीने आरोपीकडून ३० हजार रुपये उसणे घेतले होते, मात्र पैसे परत न दिल्याचे रागातून जयशंकरने ठेकेदार नंदकुमार सहानीच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून हत्या केली. या हल्ल्यामध्ये नंदकिशोरचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व हल्ल्याचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली 

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2022 at 15:43 IST
Next Story
दुचाकी प्रवास धोकादायक; जेएनपीटी महामार्गावर सर्वाधिक दुचाकी अपघात, अहवालानंतर पोलिसांची उपाययोजना