नवी मुंबई: नवी मुंबईत एकाच दिवशी चार दुचाकी एक रिक्षा आणि एका कारचे दोन चाके चोरी झाल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात सर्वाधिक कोपरखैरणे पोलीस ठाणे अंतर्गत तीन तीन दुचाकी चोरी झाल्या आहेत.
तुर्भे मधील इंदिरानगर येथे राहणारे राहुल पांडे या रिक्षा चालकाची पार्क केलेली ८० हजार रुपये किमतीची रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. राहुल यांनी २३ तारखेला तुर्भे नाका परिसरात रिक्षा पार्क केली होती दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे व्यवसाया करण्यास निघाल्यावर रिक्षा आढळून आली नाही. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
देवनार येथे राहणारे गुलाम शेख एपीएमसी मध्ये वारणार म्हणून काम करतात. १८ तारखेला ते नेहमी प्रमाणे कामावर आले. मात्र उशीर झाल्याने दुचाकीवर घरी जाण्यास कंटाळा आला म्हणून त्यांनी दुचाकी मसाला मारिक्त गाळा क्रमांक ३३ समोर गाडी पार्क करून लोकलने घरी गेले. दुसऱ्या दिवशी आल्यावर पाहता गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणी २५ तारखेला एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सेक्टर १९ कोपरखैरणे येथे राहणारे राजीव जाधव यांनी त्यांची १ लाख २० हजार रुपयांची महागडी दुचाकी २२ तारखेला याच परिसरात पार्क केली होती. मात्र रात्रीतून हि दुचाकी चोरी झाली असून या प्रकरणी बुधवारी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरखैरणे सेक्टर १६ येथे राहणारे किरण थोरात यांनी १९ तारखेला त्यांची २० हजार रुपयांची दुचाकी सेक्टर १६ येथील घर क्रमांक ५९९ समोर पार्क केली होती . मात्र रात्रीतून हि दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरी केली. हि बाब दुसऱ्या दिवशी लक्षात आली. या प्रकरणी बुधवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कोपरखैरणे सेक्टर ३ येथे राहणारे माणिक हाके यांनी त्यांची ३० हजार रुपयांची दुचाकी सेक्टर ३ च्या उद्यानाकडे जाणाऱ्या मार्गावर पार्क केली होती. हि दुचाकी रात्रीतून चोरी झाली असून बुधवारी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
टायर सह चाके चोरी .
कोपरी गावात राहणारे महेश शहा यांनी २ फेब्रुवारीला त्यांची कार सेक्टर २८ वाशी येथे पार्क केली होती दुसऱ्या दिवशी आल्यावर पाहता १० हजार किमतीचे गाडीच्या पुढचे चाक आणि टायर आणि एक मागील चाक अज्ञात व्यक्तीने चोरी केलेले आढळून आले. या प्रकरणी फिर्यादी २५ तारखेला वाशी पोलीस ठाण्यात आल्यावर तक्रार दाखल करण्यात आली असून अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

