नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या दीड महिन्यात महिलांवर हल्ला, हत्या, बलात्कार अशा घटना घडल्याने शहराची शांत शहर म्हणून प्रतिमा मलिन होत आहे. या गुन्हेगारी घटना प्रामुख्याने निर्जन स्थळी घडल्या होत्या. त्यामुळे निर्जनस्थळी पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत होती. पोलिसांनी आश्वासनही दिले होते. मात्र निर्जनस्थळी गस्तीचा प्रस्ताव कागदावरच असल्याचे चित्र आहे. गेल्या दीड महिन्यात नवी मुंबईत महिला अत्याचाराच्या तीन गंभीर घटना घडल्या आहेत. यापैकी दोन घटनांमध्ये महिलेस जिवे मारले. तिसऱ्या घटनेत महिला थोडक्यात बचावली. यातील बहुतंश घटना या निर्जनस्थळी घडल्या होत्या. हेही वाचा :Yashashree Shinde : यशश्री शिंदेचा मोबाइल रेल्वे ट्रॅकजवळ मिळाला, उरण हत्याकांडांचं गूढ उकलणार उरण येथील घटना घडल्यानंतर निर्जन स्थळी सीसीटीव्ही, गस्त अशा उपाययोजना कराव्या अशा मागणीची निवेदने सामाजिक राजकीय स्तरातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावेळी केवळ आश्वासने देण्यात आली. त्याच वेळेस गस्त सुरू केली असती तर भाविकाचा मृत्यू टळला असता, अशीही चर्चा आहे. दोन महिन्यांत तीन अत्याचाराच्या घटना ● नवी मुंबईत राहणारी महिला घरगुती वाद झाल्याने शिळफाटा परिसरातील घोळ गणपती मंदिरात गेली. तिथे बदली पुजाऱ्याने तिची विचारपूस करीत तिला चहातून गुंगीचे औषध दिले. त्याने आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांनी तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. ● उरण येथे राहणारी २१ वर्षीय युवती आणि तिचा मित्र उरण रेल्वे स्थानक परिसरातील निर्जन ठिकाणी भेटले आणि युवकाने तिच्यावर निर्दयीपणे वार करून निर्घृण हत्या केली. हेही वाचा :अनैतिक संबंधांमुळे प्रियकराच्या मदतीने जेष्ठ शिवसैनिकाची हत्या ● स्वस्तिक नावाच्या युवकाने भाविका नावाच्या त्याच्या मैत्रिणीची गळा दाबून हत्या केली आणि स्वत: जेट्टी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. निर्जनस्थळी गस्त असते. याशिवाय शहरातील अशी निर्जनस्थळे शोधण्यात आली आहेत. अशा ठिकाणी सीसीटीव्ही आणि विद्युत खांब मनपाने बसवले आहेत. पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त, नवी मुंबई