नवी मुंबई: सायबर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत चार जणांना अटक केली आहे. बात आयपीओद्वारा भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून तर दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी यांना कंपनीचे संचालक असल्याचे भासवून फसवणूक करण्यात आली होती. या गुन्प्यात एका महिलेचा समावेश असून तिच्यासह एका साथीदाराला अटक करण्यात आली.
नवी मुंबईत राहणारे फिर्यादी हे एका कंपनीत काम करीत असून कंपनीच्या पैशांचे व्यवहार त्यांच्या हातून केले जात होते. याचा गैरफायदा घेत दोन व्यक्तींनी ते फिर्यादी काम करीत असलेल्या कंपनीचे संचालक आहेत अशी बाप मारून १८ मे ते १९ मे दरम्यान कंपनीच्या खात्यातून तब्ब्ल ७५ लाख स्वतःच्या खात्यात वळवले.
याप्रकरणी शाबाज आरीफ अन्सारी, याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून अन्य साथीदार बिलकिस नसीम मोमीन हिचे नाव समोर आले. दोघांनाही सहा तारखेला अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे. दुसन्या गुन्हयामध्ये आयपीओ आणि इंडेक्स ट्रेडिंगमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून चार कोटी ७१ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. यामध्ये प्रकाश गव्हाणे आणि मनोज कालापाड, यांची नावे समोर आली.