नवी मुंबई : रसाळ फळांची मागणी वाढली | Navi Mumbai Demand for juicy fruits has increased amy 95 | Loksatta

नवी मुंबई : रसाळ फळांची मागणी वाढली

नवरात्रोत्सवात अनेक भाविकांचे नऊ दिवस उपवास असतात. यादरम्यान बहुतांश भाविकांचा उपवासाच्या दिवशी रसाळ फळे खाण्याकडे जास्त कल असतो.

नवी मुंबई : रसाळ फळांची मागणी वाढली
( संग्रहित छायचित्र )

नवरात्रोत्सवात अनेक भाविकांचे नऊ दिवस उपवास असतात. यादरम्यान बहुतांश भाविकांचा उपवासाच्या दिवशी रसाळ फळे खाण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे मागील काही दिवसांपासून फळांची रोडावलेली मागणी आता वाढली आहे. फळांचा बाजारही चांगलाच फुलला आहे़.गणेशोत्सवानतंर थेट नवरात्रोत्सवात फळांना अधिक मागणी असते. घाऊक बाजारात सफरचंद आवक वाढली आहे . परंतु सीताफळ आणि डाळींब अद्याप कमीच दाखल होत आहे. घाऊक बाजारात सफरचंद, डाळींब,मोसंबी, संत्री, सीताफळ यांची मागणी वाढली आहे.

हेही वाचा >>> पनवेल : पोयंजे गावात वृद्धाचा खून

एपीएमसीत सफरचंदची शिमला आणि काश्मीरमधील आवक वाढली असून सोमवारी फळ बाजारात ४०२९क्विंटल सफरचंद तर १४९०क्विंटल मोसंबी ,संत्री ६१३ क्विंटल , डाळींब ३७२ क्विंटल तर डाळींब अवघे ४०क्विंटल दाखल झाले आहे. बाजारात सर्वाधिक मागणी ही सफरचंदला आहे. घाऊक मध्ये सफरचंद प्रतिकिलो ७०-१२०रु , सीताफळ ८०-१००रु, डाळींब ८०-१२०रु ,मोसंबी ५०-६०रु तर संत्री ५०-१०० रुपयांवर उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उरणमध्ये घुमणार रास दांडियाचा आवाज; नवरात्रोत्सवानिमित्त जागरणाचे आयोजन

संबंधित बातम्या

पारगाव, डुंगी गावांनाही स्थलांतराचे वेध
झाडांचे पुनर्रोपण करणार सिडकोकडून माहिती
आजपासून सिडकोचा दिवाळी धमाका; ७ हजार ८४९ घरांची आज पासून विक्री सुरू

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे : विद्यापीठाला तीन वर्षांसाठी सेट परीक्षेसाठी मान्यता
मुंबई: कुर्ला, सीएसएमटी, दादर रेल्वे स्थानकांवर हल्ला करण्याची धमकी
IND vs BAN 2nd ODI: भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापत झाल्याने रोहित शर्मा रुग्णालयात दाखल
एक ‘झॉम्बी’ तर एक ‘लॉबीस्ट’ वसीम अक्रमने केले आत्मचरित्रात आश्चर्यकारक खुलासे
काजोलने सांगितला शाहरुख आणि अजय यांच्यातील फरक; म्हणाली, “SRK मेहनत…”