नवी मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करून १ कोटी २४ लाख ६९ हजार १२१ रुपयांचे अनुदान हडप केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी सुमारे २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागाचे माजी अध्यक्ष नितीन उपासनी, रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद चिटणीस मििंलद पाटील, तत्कालीन प्राचार्य अनिल पाटील, विद्यमान प्राचार्या सोनाली पाटील आदींचा समावेश आहे.
बनावट शालार्थ ओळख क्रमांक (आयडी) तयार करून अनेक संस्थांनी आणि अधिकार्यांनी राज्यात मोठा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे शासनाने या शालार्थ आयडींची कसून चौकशी सुरू केली आहे. याच चौकशीमध्ये दोषी आढळून आलेल्या
जनता शिक्षण प्रसारक मंडळ अलिबाग यांचे मानद चिटणीस मिलिंद पाटील, तत्कालीन प्राचार्य अनिल पाटील, विद्यमान प्राचार्य सोनाली पाटील, सहशिक्षिका मयुरी पाटील, जयेश पाटील, स्वप्नांची राऊत, वैभव गोसावी , तसेच खोपोली तालुका शिक्षण प्रसारक मंडळ केएमसी संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील कनिष्ठ महाविद्यालय तत्कालीन प्राचार्य एन बी पवार, एन रामास्वामी, दि पी हरिदास, एन खानविलकर, पी जी पाटील, विद्यमान प्राचार्य डीपी गायकवाड सह शिक्षिका प्राची नलावडे, संचालक दिनेश गुरव, शेखर कुलकर्णी, गायत्री कुलकर्णी तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक तत्कालीन विभागीय अध्यक्ष नितीन उपासनी यांच्या सह अजून काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील शेखर कुलकर्णी यांची पत्नी गायत्री कुलकर्णी यांनी या कमी मदत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारात कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार शालेय संस्था आणि विभागीय शिक्षण मंडळ यांच्या संगनमताने झाला आहे. त्यामुळे वाशी विभागीय मंडळाचे राजेंद्र अहिरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार वाशी पोलिसांनी सुमारे २० आरोपींचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
शेखर कुलकर्णी याने केलेला हा कारनामा शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नितीन उपासनी यांच्या आशीर्वादाने घडला आहे. उपासनी यांच्याच कार्यकालात शालार्थ ड्राफ्ट सोडण्यात आला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात असलेल्या संशयित आरोपींमध्ये शिक्षिका मयुरी पाटील, शिक्षक जयेश पाटील, स्वप्नील पाटील, वैभव गोसावी, संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील, माजी प्राचार्य एन. बी. पवार, एन. रामास्वामी, डी. पी. हरीदास, एन. बी. खानविलकर, डी. पी. गायकवाड, प्राची नलावडे, दिनेश गुरव, शेखर कुलकर्णी, गायत्री कुलकर्णी यांचा समावेश आहे.अशी माहिती वाशी पोलिसांनी दिली.
शिक्षण क्षेत्रात खळबळ
बनावट शालार्थ आयडी तयार करून राज्यभर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांचे अनुदान हडप करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असतानाच वाशी पोलिसांनी २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक मोठमोठे शिक्षण अधिकारीही या घोटाळ्यात अडकले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांचीही नावे लवकरच पुढे येणार आहे असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी संबंधित शिक्षण संस्था प्रतिनिधिची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

