navi mumbai get 1st rank in indian swachhata league zws 70 | Loksatta

नवी मुंबई इंडियन स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम

नवी मुंबई महानगरपालिका १० लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात युवकांना एकत्रित आणणारे नवी मुंबई शहर देशात नंबर वन ठरले आहे.

नवी मुंबई इंडियन स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम
दिल्ली येथे केंद्र सरकारच्यावतीने नवी मुंबईला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे

नवी मुंबई : महानगरपालिकेने मागील आठवड्यात इंडियन स्वच्छता लीगमध्ये ‘युथ वर्सेस गार्बेज’ या अंतर्गत स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाची जनजागृती करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणांना सहभागी केले होते . याची दखल घेत केंद्र सरकारकडून घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिका १० लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात युवकांना एकत्रित आणणारे नवी मुंबई शहर देशात नंबर वन ठरले आहे. दिल्ली येथे केंद्र सरकारच्यावतीने नवी मुंबईला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, अतिरिक्त शहर अभियंता संजय देसाई , घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे तसेच उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार हे उपस्थित होते.  

बेलापूर येथील रोजी राजीव गांधी मैदानात दि.२२ ऑक्टोबर रोजी इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पामबीच मार्गावर तिरंगा घेत मानवी साखळी बनवण्यात आली होती. वाशी मिनी सिशोर येथे  तृतीयपंथांकडून स्वच्छता करण्यात आले होती. राजीव गांधी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या इंडियन स्वच्छता लीगला  ५३ हजार युवकांनी सहभाग नोंदवला होता.  यावेळी उपस्थित अभिनेता मकरंदअनासपुरे  आणि नवी मुंबई संघाचे कर्णधार गायक शंकर महादेवन यांनी देखील या स्वच्छता प्रबोधनाच्या कार्यक्रमात युवकांनी नोंदवलेल्या सहभागाला दाद दिली होती.  मकरंद अनासपुरे यांनी युवकांना एकत्रित आणून स्वच्छता महत्व पटवून देणारी नवी मुंबई महानगरपालिका ही एक आदर्शवत संदेश देत आहे , असे मतही यावेळी व्यक्त केले होते. तसेच या स्वच्छता लीग दरम्यान नवी मुंबईच नंबर वन ठरणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. अखेर या इंडियन स्वच्छता लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने १० लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात प्रथम स्थान पटकावले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भाजी, फळे,भांडी फिरून विकणारे सर्वांनाच माहिती आहेत , आता तर दारूही फिरून विकणारे मिळताहेत वाचा काय आहे किस्सा

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती