नवी मुंबई: नवी मुंबईतील ऐरोली कोपरखैरणे भागात रस्त्यावर हाणामारी हि नित्याचीच झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसात त्यात अचानक वाढ झाली असून सहा अशा घटना घडल्या आहेत. त्यात एका घटनेत जीवघेणा हल्ला झाला असून त्या व्यक्तीवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्व घटनांची नोंद घेत पोलिसांनी संबंधित लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र वारंवार अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
२२ तारखेला अमित सूर्यवंशी ठाणे बेलापूर मार्गावर मी सरमाई माता मंदिर जवळ शिवशक्ती नगर येथे अमित सूर्यवंशी हे मित्रांच्या सोबत पत्ते खेळात असताना दिनेश राठोड, सत्यम राठोड , रोहित राठोड यांनी अमित याला बेदम मारहाण केली.
२२ तारखेला रात्री दोन वाजता कोपरखैराणे सेक्टर २२ येथील संगम डेअरी जवळ संजय सलगरे याला जुन्या भांडणाच्या वादातून निलेश पंडित आणि त्याच्या तीन साथीदारांनी लोखंडी पट्टीने आणि बांबूने जोरदार प्रहार केले या प्रकरणी २४ तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहान मुलांच्या खेळण्यात झालेल्या भांडणात पालकाची जुंपलेली घटना समोर आली आहे. यात दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रुकय्या शेख , हुसेन शेख सैफुल शेख , समीर शेख आणि फिर्यादी पारमिता सिंग हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांची मुले खेळत असताना त्यांच्यात काही कारणांनी भांडण झाले. या भांडणात पालक पडले आणि हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हि घटना २४ तारकेचला रात्री साडे अकराच्या दरम्यान सेक्टर १८ विशाल सोसायटी समोर घडली.
सोमवारी रात्री करणं शिंगे सानी गौड, सुरज यावं ओंकार बापकर आणि अन्य आठ ते दहा जणांनी मिळून गणेश ढोहरे या २९ वर्षीय युवकाला संशयित आरोपींनी बेदम मारहाण केली. धारधार शस्त्राने त्याच्यावर वार केले असून दगड फेकून मारले .या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी अपरात्री कोपरखैरणे तीन टाकी येथे दोन गटात हाणामारी झाली. यात गोपाळ महतो, परमजित साह , अमरजीत साह , करण साह , सचिन महतो, मिसरी सहा, लाला सहा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संशयित आरोपींनी अजय प्रसाद, विजय साह, विकी कपारी , विनॊल साह यांना बेदम मारहाण केली होती विशेष म्हणजे यातील आरोपी आणि फिर्यादी हे नवी मुंबई बाहेरील आहेत.

