नवी मुंबई: कोपरखैरणे परिसरातून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांच्या कडे ११ लाख ६० हजार रुपयांचे एम डी (मेफेड्रोन ) या अमली पदार्थांची भुकटी आढळून आली. त्या दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. हि कारवाई अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स पथकाने केली आहे.

मोहम्मद फैज अली खान (वय २४) आणि अल्ताफ मुन्ना शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यातील मोहम्मद फैज हा कोपरखैरणे भागात स्वच्छ पाण्याचे कॅन वितरण कारतणारा आहे तर अल्ताफ बेरोजगार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नाश मुक्ती अभियान जोरकस पणे राबवता त्यांना   अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचीही साथ मिळत आहे. त्यांनी आता पर्यंत लाखो रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे.

अमली पदार्थ विरोधी  टास्क फोर्सचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उदयसिंग काळे यांनी घटना स्थळाला भेट दिली होती. तर या गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक सिंघू मुंढे या करीत आहेत. 

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स विभागाला कोपरखैरणे भागात एमडी वितरण करण्यासाठी काही युवकांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोपरखैरणे भागात गस्त सुरु केली होती. २९ तारखेला अपरात्री सव्वा दोनच्या सुमारास गस्त घालत असताना सेक्टर ९ येथून रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या मार्गावर दोन युवक संशयास्पद रित्या जात असताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या कडे ५८ ग्रॅम वजनाची एम डी पावडर आढळून आली.

पथकाने तात्काळ त्यांच्या  अटक केली व कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी कडून ११ लाख ६० हजार रुपयांची एमडी पावडर ३० हजार रुपयांचा आयफोन आणि १५ हजार रुपयांचा स्मार्ट फोन असा एकूण १२ लाख ५ हजार रुपयांचा ऐजव जप्त करण्यात आला आहे.

यातील मोहम्मद हा आरोपी कोपरखैरणे भागात स्वच्छ पाण्याची कॅन वितरण करण्याचे काम करतो. पाणी अथवा खाद्य पदार्थ डिलेव्हरी करणारा कोणीतरी तरी अमली पदार्थ वितरण करत असल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. पाणी वितरण करण्याच्या धंद्याआड तो अमली पदार्थ कोणाकोणाला वितरित करीत होता याचाही तपास पोलीस करीत आहेत.