scorecardresearch

उरण ते खारकोपर मार्गावरून लोकल धावली

उरणच्या लोकलची घटिका समीप आल्याने उरणकारांनी आनंद व्यक्त केला आहे

uran-kharkopar local
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

जगदीश तांडेल, लोकसत्ता टीम

उरण: येणार- येणार म्हणून ज्या उरण लोकलची प्रतिक्षा उरणकारांना होती, ती उरणकर साखर झोपेत असतांना अखेर शुक्रवारी पहाटे खारकोपर ते उरण मार्गावरून लोकल रेल्वे धावली. त्यामुळे येत्या काही दिवसात ही सेवा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागल्याने उरणच्या लोकलची घटिका समीप आल्याने उरणकारांनी आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- नवी मुंबई: नियोजित शहरात ‘वॉकेबिलिटी’ योजनेचे तीनतेरा

अनेक वर्षांपासून उरणकरांना लोकल ट्रेन ची प्रतिक्षा आहे. मुंबई आणि नवी मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असतांनाही उरणमधील नागरिकांना व प्रवाशांना विशेषतः नवी मुंबईत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडी, खड्डे, धूळ आदी समस्यांचा सामना करीत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे कमी वेळात आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी अशी आस लागून राहिलेली होती.

आणखी वाचा- नवी मुंबई : मालमत्ता थकबाकी असणाऱ्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसचा इशारा, १५ मार्चपासून कडक कारवाई

उरण मधील प्रवासासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस व नवी मुंबई महानगरपालिका एन एम एम टी बस सेवा यांच्या बरोबरीने सध्या खाजगी वाहन सेवा ही असली तरी उरण मधील वाढते उद्योग आणि नागरीकरण यांच्यासाठी ही व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे १९९७ मध्ये मंजूर झालेल्या नेरुळ- बेलापूर ते उरण लोकल रेल्वे सेवेची ही प्रतिक्षा कायम होती. ती गुरुवारी या मार्गावरून धावलेल्या पहिल्या लोकलने दृष्टिक्षेपात आली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 12:06 IST