नवी मुंबई : नवी मुंबई लगत असणाऱ्या ठाणे बेलापूर आद्योगिक वसाहतीत मराठी भाषा उपकेंद्र उभा करणार असल्याची गर्जना राज्य सरकारने केली होती. यासाठी जागाही निश्चित करण्यात आली होती. तर या ठिकाणी विकसित करण्यात येणाऱ्या बाबत भाषणबाजी झाली होती. मात्र आज तीन वर्ष उलटून गेली तरी त्या ठिकाणी गंज चढलेली “नियोजित मराठी भाषा उपकेंद्र”ची पाटी असून भूखंडावर गवत झाडी झुडपे व्यतिरिक्त काहीही नसल्याचे चित्र आगे.

२७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन असून त्या निमित्ताने शाळा महाविद्यालय, तसेच शासकीय स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्या नंतर केंद्र सरकारचे सर्व मराठी बांधवांनी तोंड भरून कौतुक केले. या कौतुक सोहळ्यात नवी मुंबईत मराठी भाषा उपकेंद्राचे घोषणा राज्य सरकार ने केली त्यासाठी ऐरोली सेक्टर १३ येथे भूखंड क्रमांक ६ या आरक्षित करण्यात आला.

३ हजार १८. ७२ चौरस मीटरच्या या भूखंडावर उभा केल्या जाणाऱ्या मराठी उपकेंद्र इमारतीत मराठी भाषा आणि संस्कृतीचा विकास, संवर्धन आणि जतन व्हावे म्हणून हे उपकेंद्र महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातर्फे बांधण्यात येणार होते… या उपकेंद्राच्या इमारतीमध्ये मराठी भाषा संचालनालय, विश्वकोश महामंडळ इत्यादी कार्यालये सुरू होणार होती सोबतच सभागृह, बालविभाग, जेष्ठ नागरिकांसाठी दालन सुरू करण्याचा सरकारचा मानस होता. याची पाहणी २०२३ ला तत्कालीन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली होती. आणि विविध घोषणा आश्वासने दिली होती. त्यावेळी पुढच्या ८ दिवसात मुख्यमंत्री आणि मराठी साहित्यिकांना घेऊन या मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन होईल असा जाहीर शब्द त्यांनी माध्यमांसमोर जनतेला दिला होता यासाठी २६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.

मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिली असता या भूखंडावर नियोजित मराठी भाषा उपकेंद्र ची केवळ पाटी होती. मात्र अन्य परिस्थिती जैसे थेच होती. एक वीटही रचण्यात आली नव्हती किमान मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्व संध्येला तरी राज्य सरकार ला जाग येईल आणि अधिवेशन संपण्याअगोदर या उपेकंद्राचे उद्घाटन करावे अशी मागणी मनसे ने केली आहे… सोबतच विधिमंडळातील आमदारांनीही सदर बाबत अधिवेशनात सरकारला प्रश्न विचारावे असेही मनसेने मत मांडले आहे…

अन्यथा लवकरच या भूखंडावर मनसे प्रतिकात्मक रित्या भूमिपूजन सोहळा करेल असा इशारा मनसेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिला आहे…यावेळी या पाहणी दौऱ्यात मनसे नगरसेवक अभिजित देसाई, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिले,शहर सचिव रुपेश कदम,नितीन लष्कर,विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी, आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते ..