नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये नवी मुंबई देशातील तृतीय क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई नेहमीप्रमाणेच नंबर वन कचरामुक्त शहराचे ‘फाईव्ह स्टार’ मानांकन मिळविणारे शहर असून नवी मुंबई महानगर पालिकेला सातत्याने गौरवण्यात येत आहे. परंतु अजूनही शहरातील नागरिकांसाठी बनवण्यात आलेले जॉगिंग ट्रॅक तसेच विविध भागात असलेले हरित पट्टे या ठिकाणी पाणगळीमुळे सुकलेल्या पानांचे ढीग करून ठेवले जातात ते दिवसेंदिवस उचलले जात नसल्याने नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे घनकचरा विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नव्याने २०२३ स्वच्छ सर्वेक्षणाची सुरवात झाली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षणासाठी स्वच्छता मोहीम सुरू झालेली असताना घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतेबाबत आणखी बारकाईने लक्ष देण्याची मागणी नागरिक करू लागली आहेत. नवी मुंबई शहरामध्ये बेलापूर ते दिघा या आठ विभाग कार्यालयांतर्गत अनेक उद्याने हरित पट्टे व जॉगिंग ट्रॅक यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. नवी मुंबईतील नागरिक मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळी जॉगिंग करण्यासाठी बाहेर पडतात नेरूळ बेलापूर या विभागात नवी मुंबईतील सर्वात अधिक उद्याने व हरित पट्टे आहेत. जॉगिंग ट्रॅकचा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून वापर केला जातो. नेरूळ बेलापूर या विभागात अनेक प्रमुख उद्याने आहेत मँगो गार्डन वंडर पार्क रॉक गार्डन अशी अनेक उद्याने आहेत त्याचबरोबर ज्वेल ऑफ नवी मुंबई तसेच वंडर पार्क सभोवती मोठमोठे हरित पट्टे व जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी पानगळ झालेल्या सुक्या कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात पालिकेने अनेक उद्यानांमध्ये व जॉगिंग ट्रॅकच्या ठिकाणी नैसर्गिक खत निर्मितीसाठी सुविधा तयार केलेली आहे.

mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
snatched compensation of 11 crores of land in Nilje village near Dombivli on name of dead person
डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला
Independent rehabilitation system for mentally ill patients Mumbai print news
मानसिक आजारमुक्त रुग्णांसाठी स्वतंत्र पुनर्वसन व्यवस्था!
drug-resistant tuberculosis
औषध प्रतिरोध क्षयरोग नियंत्रणात, क्षय बरा होण्याचा दर २०२३ मध्ये ८२ टक्के

हेही वाचा : ‘निवडक’ चोरी, चोरांनी महागड्या साड्या चोरल्या, स्वस्त साड्यांपासून राहीले चार हात दूर

परंतु काही भागांमध्ये सुक्या पानांचे हे ढिगारे उद्यानांमध्ये व जॉगिंग ट्रॅक वर अनेक दिवस पडून असतात त्यामुळे या ठिकाणी जाणार जाणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे शहरात करोडो रुपये खर्च करून कृत्रिम रंगरंगोटीपेक्षा नैसर्गिक सौंदर्याकडे व त्याच्या स्वच्छतेकडे पालिकेने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शहरातभोवती हे सर्व करताना दुसरीकडे पालिकेने सार्वजनिक सुविधांच्या देखभालीबाबत अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.शहरातील नागरीकांसाठी हरितपट्टे,वॉकींग ट्रॅक बनवण्यात आलेले आहेत.परंतू याचठिकाणी पानगळ झालेल्या सुक्या वनस्पतींच्या पानांचे ढीग लावून ठेवले जातात.त्याबाबतही पालिकेने सजगता दाखवली पाहीजे.

शहर स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक असलेल्या नवी मुंबईकर नागरिकांचा सक्रीय सहभाग सार्वजनिक व्यवस्थांचा वापर सुयोग्य पध्दतीने होण्याची आवश्यकता आहे.आजही नागरीकांमध्ये शहरी भाग वगळता झोपडपट्टी व इतर भागात जनजागृती होणे आवश्यक आहे. ‘स्वच्छ सर्वंक्षण २०२३ ला सुरुवात झाली असून पालिकेने स्वच्छतेबाबत अधिक बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छतेचा बहुमान प्राप्त झालेला आहे.परंतू हीच स्वच्छता झोपडपट्टी व गावठांणापर्यंत पोहचली पाहीजे.शहरात सर्वाधिक उद्याने नेरुळ,बेलापूर विभागात आहेत.याच उद्यानांमध्ये असलेली दुरावस्था दूर होण्याची आवश्यकता आहे. ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे असलेल्या जवळजवळ २.५ किमी. वॉकिंग ट्रॅकच्या अवतीभोवती पानगळीचे ढीग असतात.त्यामुळे पालिकेने याकडे दुर्लक्ष न करता रस्त्याच्या कडेला तयार करण्यात आलेल्या बिन ओसंडून वाहत असतात. त्यामुळे त्याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा : उरण शहरातील गांधी पुतळा परिसर बनलेय वाहनतळ

देशातील ३ हजार शहरापेक्षा अधिक शहरांमधून शहराचा तिसरा क्रमांक मिळाला याचा नवी मुंबई शहरातील नागरिक म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. जॉगिंग ट्रॅक जवळ सुक्या पानांचे ढीग लावून ठेवले जातात व त्या अनेक दिवस तसेच असतात त्यामुळे याबाबत पालिकेने अधिक खबरदारी घेतली पाहिजे. – प्रवीण झा, नागरीक, नेरुळ

शहरातील जॉगिंग ट्रॅक व हरित पट्टे या ठिकाणी सफाई कामगारांकडून सुक्या झाडांच्या पानांचे ढिगारे करून ठेवले असतील तर याबाबत सफाई कामगारांना योग्य त्या सूचना देण्यात येतील. सुक्या पानांचा कचरा व त्यापासून खत निर्मितीसाठी पालिकेने उद्यानातच सुविधा केलेली आहे याबाबत कामगारांना तात्काळ सूचना देण्यात येतील.- राजेंद्र सोनवणे , मुख्य स्वच्छता अधिकारी