पालिकेच्या आयुक्तपदाच्या अतिरिक्त कार्यभारानंतर लवकरच बांगर घेणार मुख्यालयात बैठक

संतोष जाधव,लोकसत्ता

pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
Jalgaon Massive Explosion, Maurya Chemical Company, 20 Employees Injured, jalgaon midc, fire in Maurya Chemical Company, marathi news, fire in jalgaon, jalgaon news
जळगावात अग्नितांडव; रसायन कंपनीत स्फोट; २० पेक्षा अधिक कामगार गंभीर
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

नवी मुंबई- संत गाडगेबाबा अभियानात पहिले तीन वर्ष सलग महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर व देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई शहराला व महापालिकेला स्वच्छतेत नावलौकीक मिळवून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यात नेहमीच प्रथम तर देशात सतत मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबईचा  नावलौकीक  आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा नवी मुंबईकर नागरीक म्हणून सर्वांनाच शहराचा व नवी मुंबई महापालिकेचा अभिमान बाळगला जात असताना दुसरीकडे देशातल्या अनेक शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानाबाबत कमालीची स्पर्धा सुरु झाली असताना या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे नवी मुंबईतील चित्र थंडावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.परंतू आता याच स्वचछ सर्वेक्षण अभियानाला  नवी मुंबईचे अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे आयुक्त लवकरच स्वच्छता अभियानाला बांगर “ बुस्टर ” देणार आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई: एपीएमसीचे सभापती अशोक डक यांचा राजीनामा; लवकरच निवडणूक होणार

स्वच्छ सर्वेक्षण अभियान व नवी मुंबई सध्याची अभियानाबाबतची स्थिती या नावलौकीकात यंदाची स्थिती  ढेपाळलेली , चिंताजनक आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे. देशातील स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला जेव्हापासून सुरवात झाली तेव्हापासूनच नवी मुंबई महापालिकेने या अबियानात भरीव योगदान दिलेले आहे. शहर स्वच्छतेत शहरातील प्रत्येक नागरीकाबरोबरच पालिका अधिकारी, स्वच्छता कर्माचाऱ्यांचे य़ोगदान मोलाचे आहे.देशात तिसरा क्रमांक प्राप्त झाल्यानंतर पालिकेने या अभियानात सिंहाचा वाटा असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान  केला होता.त्याचवेळी  सर्व मिळून अधिक जोमाने काम करूया आणि आपले मानांकन उंचवूया असा निर्धार  पालिका अधिकारी,कर्मचारी व्यक्त केला होता.पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनाही या अभियानाचे व स्वच्छताकर्मींचे कौतूक केले होते.शहरात पुन्हा एकदा रंगरंगोटी व साफसफाईला सुरवात झाली असली तरी या अभियानासाठीचा गेल्यावर्षीचा जोश व उत्साह  पालिका मुख्यालयात व शेवटच्या नागरीक व कर्मचाऱ्यापर्यंत तितकासा टिकून राहीला नसल्याचे चित्र आहे. देशात स्वच्छतेत क्रमांक मिळवल्याचा अभिमान वाटत असताना  दुसरीकडे शहराचे स्वच्छतेतील स्थान कमी न होता ती वाढवण्याची जबाबदारी समस्त नवी मुंबईकर व प्रशासकीय यंत्रणांची आहे. शहरात फक्त रंगरंगोटी करुन चालत नाही.तर येथील प्रत्येक नागरीकाच्या कृतीतून हे स्वच्छता अभियान मोलाचे ठरते. त्यामुळे पालिकेने देशात स्वच्छतेत मिळवलेला क्रमांक वाढवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे पालिकेच्या शेवटच्या कर्मचाऱ्यांच्यापरप्यंत  अंगात व कृतीत स्वच्छतेचा जोश ,जागर पाहायला मिळायला हवा. स्वच्छता कर्मचारी ,अधिकारी यांचा  जोश पुन्हा अवतरणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.आयुक्त नार्वेकर यांनी याबाबत चांगली सुरवात केली परंतू  नार्वेकर प्रशिक्षणासाठी बाहेर गेल्याने आता नवी मुंबई पालिका स्वच्छता विभागाला पुन्हा एकदा नवा जोश देण्याचे काम केले जाणार आहे.

हेही वाचा >>> २१ वर्षांपासून सुरू असलेल्या धर्मवीर क्रिकेट स्पर्धांचा रंगणार थरार; संजय राऊत यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार

शहरातील उद्याने, रस्त्यावरील दैनंदिन सफाई, योग्य पध्दतीने होणारी कचरा वाहतूक यासह सर्वच बाबीवर विचार होण्याची आवश्यकता आहे.देशात दुसरीकडे या अभियानाच्या अनुषंगाने चंदीगडसारखे शहर मोठ्या जोमाने जोशाने कामाला लागले असून यशस्वीतेचा चंग मनाशी  बांधून जोशात तिकडे काम सुरु आहे,त्यामुळे देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची स्पर्धा अधिक जोशपूर्ण होण्यासाठी सर्वांनीच नागरीक म्हणूनही वाटा उचलणे महत्वाचे ठरणार आहे.

नवी मुंबई शहराने मागील वर्षी तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवून प्रत्येक नागरीकाला अभिमान वाटेल अशी कामगिरी यंदाही होणे गरजेचे आहे.

पणन चालकांकडून सभापतींचा राजीनामा मंजूर

एपीएमसी सभापती अशोक डक यांनी दि.२१ बुधवारी दुपारी पणन संचालकांकडे एपीएमसी सभापती पदाचा राजीनामा पाठवला होता. पणन संचालकांनी सभापतींचा राजीनामा तात्कळ मंजूर करून बुधवारी सायंकाळी ६ ते ७ दरम्यान एपीएमसी प्रशासनाला परिपत्रक पाठवून सभापतींचा राजीनामा मंजूर करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

कोणत्याही शहराला देशातील स्वच्छ अभियानात प्रथम क्रमांकाचेच पारितोषिक मिळावे असे वाटते.त्यामुळे पारितोषिक मिळण्यापेक्षा तो क्रमांक टिकवणेही अत्यंत महत्वाचे आहे.त्यामुळे लवकरच पालिकेत बैठक घेणार आहे.

अभिजीत बांगर, कार्यभार अतिरिक्त आयुक्त ,नवी मुंबई महापालिका