नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडून महापालिकाक्षेत्रात सुरु असलेल्या सांडपाण्यावरील प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच शहरात सुरु असलेल्या विज्ञान केंद्र, वंडर्स पार्क, जलतरण तलाव, यासह विविध सुरु असलेल्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करुन वेगवान व दर्जेदार कामासाठी आग्रही राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी लोकसत्ताला दिली.

हेही वाचा- ३६ लाखांचं वीजबिल २९ लाखांवर…; नवी मुंबई महापालिकेचा वीजबचतीचा फॉर्म्युला आहे तरी काय

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे

मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी कऱण्यात येणा-या विविध उपाययोजनांमध्ये सेक्टर ९ ए, वाशी येथील बस स्थानकाच्या भूखंडावर बस टर्मिनलसह वाणिज्य संकुल विकसित करण्यात येत आहे. त्या कामाच्या सद्यस्थितीची शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली व विहित कालावधीत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. सदर इमारतीमधील सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर त्याची दुरुस्ती व देखभाल नियमितपणे राखली जावी याकरिता आधीपासूनच नियोजन करण्याचे आदेश संबंधित अदिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा- यंदा द्राक्षे खाण्यासाठी वाट पाहावी लागणार, कारण…

नवी मुंबई महानगरपालिका पहिवहन उपक्रमाच्या अखत्यारितीतील वाशी सेक्टर ९ येथील बस स्थानक भूखंडावर बस स्थानकासह वाणिज्य संकुलाची २१ मजली इमारत उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून सद्यस्थितीत १९ व्या मजल्यावरील बांधकाम सुरु आहे. १०३७४.४२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर ४७७३१ चौ.मी. क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येत आहे. जून २०२३ पर्यंत सदर बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर १३ बस स्थानके असून एनएमएमटीसह बेस्ट व एसटी महामंडळाचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष असणार आहेत. याशिवाय तळमजल्यावर ७ दुकाने व सार्वजनिक स्वच्छतागृह व्यवस्था करण्यात आलेली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : यावर्षी आकर्षक नंबरमधून आरटीओला ३ कोटींचा महसूल

पहिला मजला ते चौथा मजला यावर पार्किंगची व्यवस्था असून एकूण ४२० चारचाकी तसेच ४३ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ६ रेस्टॉरंटची सुविधा असून प्रशस्त लॉन आहे. सहाव्या ते अठराव्या मजल्यावर प्रत्येक मजल्यावर ५ अशी एकूण ६५ कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर १९ वा मजला विशेषत्वाने अग्निशमन व सुरक्षा विषयक बाबींकरिता उपलब्ध करून देण्यात आला असून २० व्या व २१ व्या मजल्यावर प्रत्येकी ५ अशाप्रकारे १० कार्यालये असणार आहेत. त्यामुळे शहरात पालिकेमार्फेत सुरु असलेल्या महत्वपूर्ण कामांची पाहणी पालिका आयुक्तांनी सुरु केली. तसेच दर्जेदार कामाविषयी कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे पुढील दिवसात शहरात सुरु असलेल्या विविध महत्वपूर्ण कामांची पाहणी करण्याचे चित्र आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: पर्यटक परदेशी पाहुण्यांच्या प्रतिक्षेत! हिवाळा लांबल्याने फ्लेमिंगोच्या आगमनाला उशीर?

नवी मुंबई शहरात सुरु असलेले पालिकेचे महत्वपूर्ण प्रकल्प यांची पुढील काही दिवसात प्रत्यक्ष पाहणी करुन असणार असून कोणत्याही कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दर्जेदार व पालिकेच्या नावलौकिकाला शोभेल अशा प्रकारचे काम करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.