नवी मुंबई महानगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला व २०२३-२४ चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज शुक्रवारी पालिका आयुक्त व प्रशासक राजेश नार्वेकर सादर करणार असून या अर्थसंकल्पात अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर व तर शहरासाठी पायाभूत सुविधा पुरवणारे नवे प्रकल्प या अर्थसंकल्पात सादर केले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शुक्रवारी सादर व मंजूर होणाऱ्या अर्थंसंकल्पात कोणकोणते नवीन प्रकल्प असतील व नवी मुंबईकरांसाठी कोणत्या अधिकच्या सुविधा असतील याबाबतची उत्सुकता नवी मुंबईकरांना आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : शैक्षणिक वर्ष अखेरपर्यंतही शिक्षक नाहीच, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ

69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
electric bus
कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी एकत्रित बस सेवेचा विचार; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती
loksatta analysis ai based system to reduce human wildlife conflict in tadoba andhari tiger reserve
विश्लेषण : ताडोबातील वन्यजीवमानव संघर्षात ‘एआय’ नेमके काय करणार?

पालिकेने २०२२-२३ या गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या मूळ अर्थसंकल्पात १३५४.३५ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह ४९९१ कोटी जमा व ४९०८ कोटी खर्चाचे व १.८० कोटी शिलकीचे नवी मुंबई महापालिकेचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आले होते.यावर्षीही शिलकीचा अर्थंसंकल्पीय अंदाज सादर करण्यात येणार असून यावर्षीचा अर्थसंकल्प हा प्रथमच ५ हजार कोटींच्यावर जाणार आहे.त्यामुळे या अर्थसंकल्पाविषयी नवी मुंबईकरांना उत्सुकता आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: सायकल ट्रॅकमध्ये इको फ्रेंन्डली साहित्य वापराच्या सूचनेची बोळवण?

तत्कालिन पालिका आयुक्त व प्रशासक अभिजीत बांगर यांनी गतवर्षी अर्थसंकल्प सादर व मंजूर केला होता.यंदा पालिका निवडणुकीच्या शक्यतेमुळे करवाढीची घंटा कोणत्याच राजकीय पक्षाला परवडणारी नसल्याने यंदाचा अर्थसंकल्पही कोणतीही करवाढ नसलेलाच असण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे.त्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्त सादर व मंजूर करणारा अर्थसंकल्प कोणतीही करवाढ नसलेला अर्थंसकल्प ठरणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काही ठाराविक नवे प्रकल्प वगळता गतवर्षीच्या जुन्याच अर्थसंकल्पाला नवी झळाळी मिळणार असल्याचे चित्र अर्थसंकल्पात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- नवी मुंबई महापालिका प्रशासकाच्या कार्यकाळातच पालिका तिजोरीतून सर्वाधिक खर्च !

शहरात मागील ३ वर्षात करोनाच्या संकटामुळे मालमत्ता,पाणीपट्टी अशा प्रकारची कोणतीही दरवाढ नसलेला अर्थसंकल्प असेल. श्रीमंत महापालिका अशी बिरुदावली असलेल्या नवी महापालिकेच्या अर्थसंकल्पात शहरात नागरीकांच्या हितासाठी भविष्याचा विचार करता हा अर्थसंकल्प नवी मुंबईकरांना भौतिक व नागरी सुविधा देण्याबरोबरच जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य ,शिक्षण,परिवहन, नागरीकांच्या सुरक्षेसाठी तिसऱ्या डोळ्याची अर्थात सीसीटीव्हीची नजर,वाहतूक सुलभतेसाठी शहरातील उड्डाणपुल, मोरबे धरण परिसरात होणारा सोलार प्रकल्प एमआयडीसीतील रस्ते कॉक्रीटीकऱण पूर्ण करणे यासारख्या चांगल्यासुविधा देण्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण कामे निश्चित करण्यात येणार असून शहरात सध्या सुरु असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची तरतूद अशा बाबींचा अर्थसंकल्पात समावेश असेल तर नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले व नव्या शैक्षणिक वर्षातनवे वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच आरेग्यसुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे चित्र आहे. परंतू दुसरीकडे गेल्यावर्षी सुरु झालेल्या अनेक जुन्या प्रकल्पांनाच पूर्ण करण्याचे उदिष्ट या अर्थसंकल्पातही पाहायला मिळणार असून शिक्षणाचा दर्जा अधिक वाढवण्यासाठी घोषणा केलेली परंतू सीबीएसई शाळांची वाढही अपेक्षित आहे.

आगामी वर्षात वाशी,नेरुळ,ऐरोली येथील आरोग्यसेवा अधिक दर्जेदार व पूर्ण क्षमतेने देताना आरोग्यसुविधेसाठीही मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. शहरात शिक्षण व पायभूत सुविधांवरही अधिक खर्च केला जाणार असून शहरात स्मार्ट पार्किंग,तसेच पर्यावरणपुरक वाहनांचा वापर करण्याकडे अधिक भर दिला जाणार आहे. यंदा परिवहन उपक्रमासाठी पालिकेकडून जास्तीत जास्त अनुदान मिळणार का याचीही उत्सुकता आहे.तसेच शहरात जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीचीही तरतूद केली जाणार आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : शाळांत क्रमांकासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा, मागण्या मान्य न केल्यास परीक्षेवर बहिष्काराचा इशारा

नवे प्रकल्प राबवणे व जुने प्रकल्प पूर्ण करणारा समतोल अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजामध्ये नागरी सुविधा तसेच आरोग्य व शिक्षणासह नागरीकांची सुरक्षा महत्वाची असून शहरात आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याच्या दृष्टीने उपायोजना करण्याचे प्रयत्न आहेत.तर गतवर्षात सुरु केलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्षही आहे. तर नागरीकांना मूलभूत सुविधेत वाढ करणारे काही नवे प्रकल्पही राबवले जाणार असून नव्या जुन्याची सांगड घालणारा वास्तववादी अर्थसंकल्प शुक्रवारी सादर व मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.