नवी मुंबई महापालिकेने वाशी गावातील उच्च दाबाच्या वीज वाहीनीखाली असलेल्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली आहे. यावेळी तब्बल २६३ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने अतिक्रमणविरोधी विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभगाचे सहाय्यक आयुक्त अमित कुमार सोंडगे यांच्या वतीने सोमवारी दि २९ मे ला ही कारवाई करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. मात्र याच स्मार्ट शहरात आजही मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य पहावयास मिळते. मोठ्या प्रमाणात शासकीय जागेत या झोपड्या उभ्या राहत आहेत.

हेही वाचा >>> पनवेल: वीज कापण्याच्या बहाण्याने पाऊणेसात लाखांची फसवणूक

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
thieves firing at malkapur railway station
मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांचा गोळीबार; पाठलाग करणाऱ्या नागरिकांना…
Kalyan, Road Works, Waldhuni Flyover, Traffic Jams, Commuters, public,
कल्याणमधील वालधुनी भागातील वाहन कोंडीने प्रवासी हैराण
Titwala
टिटवाळ्याजवळ लोकलवर भिरकावलेल्या दगडीत दोन प्रवासी जखमी

कोपरखैरणे रेल्वे स्थानकालगत असलेल्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर ते फुटपाथवर अनधिकृत झोपड्या उभारल्या आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी वन विभागाच्या जागेत अनधिकृतपणे उभारलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. वाशी गावातील उच्च दाबाच्या वीजवहिनी खाली भूखंड क्रमांक १ वर देखील अशाच प्रकारे झोपडपट्टी उभी राहिली होती .याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या नंतर विभाग अधिकारी अमित कुमार सोंडगे व वाशी विभाग अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने  कारवाई करत २६३ झोपड्या  जमीनदोस्त केल्या आहेत . या वेळी कोणतीही अनुचित घटना घडून नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यापुढे शहरात चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे.अशी माहिती अतिक्रमण उपायुक्त यांनी दिली. अनधिकृत झोपडपट्टी आणि त्यामुळे शहरात अस्वच्छता पसरत असून बकालपणा येत आहे.