ख्रिसमस अर्थात नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर नवीन वस्तू खरेदीचा बाजारपेठांतील उत्साह लक्षात घेऊन या गर्दीमध्ये स्वच्छता संदेशाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाच्या वतीने वाशी येथील इनॉर्बिट मॉल आणि सीवूड नेरूळ येथील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये ‘फ्लॅश मॉब’ ही अभिनव संकल्पना उत्साहाने राबविण्यात आली. या दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने कुटुंबासह उपस्थित असलेल्या नागरिकांनी फ्लॅश मॉबमधील गीतनृत्यांना उत्तम प्रतिसाद देत यातील शंबरहून अधिक कालाकलाकारांसह ‘निश्चय केला, नंबर पहिला’ चा गजर केला.

यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ ला सामोरे जात असताना गतवर्षीचे देशातील तृतीय क्रमांकाचे मानांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले असून विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून फ्लॅश मॉबची संकल्पना राबविण्यात आली, ज्यामधील गीतनृत्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुकाची दाद दिली. सर्वसाधारणपणे सणानिमित्ताने मॉलमधील वातावरण खरेदीच्या उत्साहाचे असताना अचानक सगळीकडून वाद्ये वाजू लागतात आणि लोकांना काही कळण्याच्या चारीदिशांनी शेकडो युवक – युवती मॉलच्या मधल्या मोठ्या जागेत एकत्र येतात आणि लोकप्रिय गाण्यांवर नाचू लागतात.

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु

हेही वाचा: नवी मुंबई: सहनिबंधक कार्यालयात घराची नोंदणी न करणे पडले महागात; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

हे अचानक काय झाले हे बघण्यासाठी सगळे त्यांच्या आसपास दुतर्फा जमतात आणि उत्सुकतेने बघू लागता. त्यातील काही गाण्यांतून स्वच्छता संदेशाचे प्रसारण होते आणि नागरिकांच्या मनावर कचरा वर्गीकरणाचा तसेच स्वच्छतेचा संदेश बिंबविण्यासाठी फ्लॅश मॉबची अनोखी संकल्पना नवी मुंबई महानगरपालिकेने राबविली असल्याचे लोकांना कळते.

हेही वाचा: नवी मुंबईतील वाशीमध्ये पाणीबाणी; मनपावर टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की

मग लोकही स्वच्छतेविषयी जनजागृतीच्या या फ्लॅश मॉब उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी होतात आणि स्वच्छतेचा एकच जागर केला जातो. वाशीमधील इनॉर्बिट मॉलमध्ये व सीवूड मधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये सायंकाळी कोणतीही पूर्वकल्पना नसताना अचानक घडविलेल्या फ्लॅश मॉब या अभिनव उपक्रमामुळे स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत अनोख्या पध्दतीने पोहचविण्यात आला, ज्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.