संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान या महाराष्ट्रभर व्यापक स्वरुपात माजी मुख्यमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या स्पर्धेत नवी मुंबई महापालिकेने सलग ३ वर्ष महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळवला आहे. या बहुमानानंतर आता नवी मुंबई महापालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याची तयारी सुरु केली आहे. शहर स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरणाकडे पालिकेने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. वारंवार सूचना देऊनही कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असताना दुसरीकडे पालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. परिणाणी कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवली जाणार आहे. आगामी काळात संकलन व वाहतूक यासाठी नव्याने होणाऱ्या निविदा प्रक्रियेमध्ये कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवून विविध पध्दतीचा कचरा वेगळा करण्याचा पालिकेचा मानस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- कांदा रडवणार? दिवाळीनंतर कांदा महागण्याची शक्यता

ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक

शहरात ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणेच घरगुती घातक कचरा वर्गीकरण करण्याची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येत आहे. नव्याने होणाऱ्या प्रक्रियेत ओला , सुका व घातक कचऱ्याच्या वर्गीकरणाबरोबरच नव्याने प्लास्टिक, लाकूड, काच, धातू अश्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन कचरा संकलन केले जाणार आहे. त्याबाबत पालिकेचे नियोजन सुरु असून अखिल भारतीय स्वराज्य स्थानिक संस्थेच्या सहकार्याने पालिका विस्तृत कचरा वाहतूक व संकलनाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत तयारी सुरु झाली आहे. नवी मुंबई शहरात शहर सुशोभिकरणाप्रमाणेच पर्यावरणास पूरक अशा सुधारणा केल्या जाणार आहेत. करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर आता ‘रस्त्यावर शून्य कचरा ‘ नजरेसमोर ठेवून ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे पालिकेने बंधनकारक केले आहे. आगामी काळात कचरा वाहतूक व संकलनाच्या कामात अधिक व्याप्ती होणार आहे. एकीकडे ज्या सोसायट्या ओला सुका कचरा वेगळा करणार नाही अशा अनेक सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरु केली आहे. कचरा वर्गीकरणात मोठ्या प्रमाणात पालिका आयु्कांच्या नियोजनातून शहरी भागातील नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : चक्क संरक्षक भिंत तोडून फेरीवाल्यांनी मांडले बस्तान

कचरा संकलनाबाबत पालिकेला चांगला प्रतिसाद

शहरी भागाबरोबरच दुसरीकडे मूळ गावठाणांकडून कचरा संकलनाबाबत पालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असून नव्याने कचरा संकलन वाहतूक निविदा काढताना अनेक तंत्रज्ञान व अद्ययावत गोष्टींच्या मदतीने कचरा संकलनाची व्याप्ती वाढवली जाणार आहे. याबाबत गावठाण भागात कचरा वर्गीकरणाबाबत नाराजी व्यक्त केली जात असली तरी पालिकेने घरगुती घातक कचरा वेगळा करणे अनिवार्य केले असून दंडात्मक कारवाई केली जात आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरण करूनच दिला जावा, असा पालिकेचा आग्रह आहे.

कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई

ज्या सोसायट्या कचरा वर्गीकरण करणार नाहीत. त्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. नवी मुंबई शहरात कचरा संकलन करण्यासाठी असलेल्या मोठ्या कचरा वाहतूक गाड्यांमध्येही आता घरगुती घातक कचरा करण्यासाठीची सुविधा केली असून नागरीकांनी हा घातक कचरा वेगळा जमा करावा.तसेच मोठ्या सोसायट्या वगळता इतर लहान सोसायट्यांनीही छोट्या कागदी पिशव्यांमध्ये घातक कचरा जमा करण्याचे आवाहन केले आहे. परंतू आता ओला,सुका, घातक यांच्याबरोबरच विविध ५ प्रकारचा कचरा वर्गीकरणाचा पालिकेचा संकल्प आहे. सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण होणार नाही त्या सोसायटीला प्रत्येक घराप्रमाणे २५० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

आगामी काळात कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढणार

घरगुती घातक कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. शहरात नागरीकांनी स्वयंशिस्त पाळून कचऱ्याचे वर्गीकरण करुनच घातक कचराही वेगळा द्यावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. स्वच्छ अभियानात नवी मुंबईची कामगिरी राज्य व देशपातळीवर गौरवली जात असताना नागरीकांनी ओला व सुका कचरा, घरगुती घातक कचरा वेगळा करणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. ज्या सोसायट्या घातक कचरा वर्गीकरण करत नाहीत त्यांना पालिका नोटीस बजावत त्याच्यावरही दंडात्मक कारवाई होणार आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई शहरी भागात मोठ्या प्रमाणात कचरा वर्गीकरण होत असताना अजूनही नागरीकांमध्ये घरगुती घातक कचरा वर्गीकरण अंगवळणी पडणे आवश्यक आहे. नागरीकांनीही याबाबत स्वयंशिस्तीने घातक कचरा जमा करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. आता आगामी काळात कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढणार आहे.

हेही वाचा- उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

कचरा वाहतूक व संकलनात मोठे बदल

नवी मुंबई महापालिकेने ७ वर्षापूर्वी करण्यात आलेल्या कचरा वाहतूक व संकलनात मोठे बदल होणार आहेत. कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढली जाणार असून कचरा संकलनात ओला ,सुका, घातक याच बरोबरच अनेक प्रकारातील कचरा वर्गीकरण होणार आहे. त्यामुळे नव्याने करण्यात येणाऱ्या कचरा संकलन व वाहतूक निविदेत अनेक अद्ययावतबाबींचा समावेश केला जाणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation will increase the scope of waste classification dpj
First published on: 19-09-2022 at 12:46 IST