विविध शहरांमधील गोवरचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन गोवरचा नवीन रुग्ण आढळल्यास त्या भागात ९ महिने ते ५ वर्ष वयाच्या बालकांना मिझेल रुबेलो लसीचा १ अतिरिक्त डोस तसेच ६ महिने ते ९ महिने वयाच्या बालकांस एमआर लसीचा झिरो डोस देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे या ४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिरिक्त डोस व झिरो डोस देण्यात आले. गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रभाग निहाय सर्वेक्षण आणि लसीकरणावर जोर दिला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई :वाशी फिडरमधील तांत्रिक बिघाडामुळे कोपरखैरणेतील अनेक भागात अंधार; दोन तासांनी वीजपुरवठा सुरळीत

पावणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील १९ बुथवर १५९६ अतिरिक्त डोस, जुहूगांव नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रात १७ बुथवर ६० झिरो डोस व १४०५ अतिरिक्त डोस देण्यात आले. त्याचप्रमाणे करावे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २० बुथवर ५९ झिरो डोस व १०२५ अतिरिक्त डोस आणि सीबीडी बेलापूर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २७ बुथवर ५९ झिरो डोस व ११६२ अतिरिक्त डोस देण्यात आलेले आहेत. अशाप्रकारे एकूण १७८ बालकांना झिरो डोस व ५१८८ बालकांना अतिरिक्त डोस म्हणजेच एकूण ५३६६ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा- सीवूड्समधील टिळक एज्युकेशन शाळेच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम; नवी मुंबई महापालिकेने बजावली नोटीस

जास्तीत जास्त लाभार्थांना लसीकरणाचा लाभ मिळावा या उद्देशाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे खैरणे या कार्यक्षेत्रात ५ डिसेंबरपासून लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये ८७५५ अतिरिक्त डोस व २२४ झिरो डोस देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खैरणे या परिसरात प्रभाव आढळल्याने त्याठिकाणी ५ ते ९ डिसेंबर या कालावधीत ९ महिने ते ५ वर्ष वयाच्या ६४०६ बालकांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून ४३ बुथचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporations survey to prevent the impact of measles emphasis on vaccination dpj
First published on: 09-12-2022 at 13:37 IST