Navi Mumbai Murder: लग्नासाठी मुलगी बघून देण्यासाठी घेतले ४० हजार, नंतर संपवले मित्राला

मयताची ओळख पटू नये यासाठी मृतदेह जाळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

Navi Mumbai Murder: लग्नासाठी मुलगी बघून देण्यासाठी घेतले ४० हजार, नंतर संपवले मित्राला
खून प्रकरणात तीन आरोपींना अटक

नवी मुंबईच्या पनवेलमध्ये लग्नासाठी मुलगी बघायला सांगणाऱ्या आपल्या मित्रालाच संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नासाठी मुलगी बघून देण्यासाठी घेतलेले ४० हजार रुपये परत करावे लागू नयेत, यासाठी मित्रालाच संपवल्याची घटना समोर आली आहे. १० दिवसांपूर्वी पनवेल तालुका पोलिसांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या युवकाचा खून त्याच्या मित्रानेच केल्याचे आता पोलीस तपासात उघड झाले आहे.

मृत युवकाने आरोपीकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळून आरोपींनी या युवकाला संपवण्याचा कट आखला. या युवकाला जंगलात नेऊन दारू पाजण्यात आली. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. युवकाची ओळख पटू नये यासाठी मृतदेह जाळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धुळ्यात हत्येची धक्कादायक घटना; साडेतीन हजार रुपयांच्या वादातून तरुणाची गोळ्या घालून हत्या

दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. मृत व्यक्ती उसर्ली खुर्द येथील रहिवासी होता. याप्रकरणी याच परिसरात राहणाऱ्या नरेश बेटकरला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत या आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. घटनेनंतर आरोपीचे दोन साथीदार उत्तर प्रदेशात पळून गेले होते. त्यांना उत्तर प्रदेशातून पोलिसांनी अटक केली आहे.

संतापजनक! साताऱ्यात भावावरील रागातून सख्‍ख्‍या काकाने १० महिन्यांच्या पुतण्‍याला फेकले विहिरीत, चिमुकल्याचा मृत्यू

या प्रकरणात पोलीस तपासात आणखी एक नवा खुलासा झाला आहे. मृत व्यक्तीने एका ठिकाणी रुम बुक केली होती. त्यासाठी बिल्डरला सहा लाख रुपये दिले होते. हे पैसेही मृत व्यक्तीची फसवणूक करुन हडपण्याचा डाव आरोपींचा होता. तपासाची चक्रे वेगाने फिरवत अत्यंत कमी कालावधीत उपायुक्त शिवराज पाटील यांच्या पथकाने या खून प्रकरणाचा तपास केला.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
तैवानलगतचा लष्करी सराव त्वरित थांबवा ; अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, जपानचे चीनला आवाहन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी